मुंबई : राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने आता सर्वत्र जोरदार कमबॅक केलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. अशात आता हवामान खात्याकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात पावसानं हजेरी लावली आहे.

गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह, ठाणे परिसरात पावसाची रिपरिप सुरू आहे. अशात पुण्यासह पालघर, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि घाट माथ्यावर पावसानं हजेरी लावली आहे. हवामान खात्याकडून तीन दिवसांसाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आणि पुण्याला पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईसह पुणे, रायगड, रत्नागिरी, नगर, कोल्हापूर, वर्धा आणि बुलढाणा या जिह्यांमध्ये दोन दिवसांपासून धुवांधार पाऊस सुरू आहे. नाशिक नंदूरबार, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पुढील ६ दिवस म्हणजे २० सप्टेंबरपर्यंत विदर्भात अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्याच्या या भागात पुढील ६ दिवसात पावसाची शक्यता, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम जाणवणार?
अमरावतीचे हवामान तज्ज्ञ प्रा. अनिल बंड यांच्या अंदाजानुसार, विदर्भात पुढील सहा दिवस, २० सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता दिली आहे. ठळक कमी दाबाचे क्षेत्र वायव्य मध्य प्रदेशवर आहेत. सोबतच ७.६ किमी उंचीवर चक्राकार वारे आहेत. हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-वायव्य दिशेने हळूहळू पुढे सरकत आहे. या वातावरणामुळे १५ ते २० सप्टेंबरदरम्यान विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अनेक भागात शेतशिवारात पावसाचे पाणी

तेल्हारा तालुक्यात तब्बल ४८.१ मिलीमीटर तर अकोट आणि बाळापूर तालुक्यात ४५ मिमीच्यावर पाऊस होता. कालच्या तारखेत अकोट तालुक्यात सर्वाधिक २७.२ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील जलप्रकल्प, शेती आणि सिंचनासाठी हा पाऊस समाधानकारक असला तरी अती पावसामुळे शेत-शिवार खरडून गेल्याने अनेक पिकांना याचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी कपाशीची शिवार खरडून निघाली असून शेतशिवारात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला, देवेंद्र फडणवीसांचं पहिलं ट्विट, म्हणाले ‘मला खेद वाटतो की…’
आतापर्यंतच्या सरासरीनुसार जिल्ह्यात ६३० मिलीमीटर पावसाची अपेक्षा राहते, त्यानुसार सुमारे ६२३ मिलीमीटर पाऊस अकोला जिल्ह्यात झाला आहे. आताच्या सरासरीनुसार पावसाचे जिल्ह्यातील प्रमाण ९८.८ मिलीमीटर झाला असून पावसाळ्यातील सरासरीचा विचार केल्यास जिल्ह्यात ६९३.७ मिलीमीटर पाऊस होतो. त्या तुलनेत ८९ टक्के’च्यावर पाऊस झाला आहे. मागील वर्षी हे प्रमाण १०७.०२ टक्के होते.

दरम्यान, पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहेय. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार पावसामुळे त्यामुळे अनेक प्रकल्पांचे दरवाजे उघडावे लागले तर मध्यम प्रकल्प ओंसडून वाहत आहे. सध्या ९ मोठ्या प्रकल्पांपैकी ८ तर २७ मध्यम प्रकल्पांपैकी २० आणि शेकडो लघू प्रकल्प ओसंडून वाहत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून मोठ्या प्रकल्पांपैकी अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील पुस, अरुणावती, बेंबळा. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, वान. बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी, खडकपूर्णा या प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे.

Maharashtra Rain Update : मुंबईकरांनो सावधान, ‘या’ तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here