मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज वाढीसह व्यवसायाची सुरुवात झाली आहे आणि शेअर बाजारात हिरव्या चिन्हात व्यापार खुला झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह खुले झालं तर कालच्या जोरदार घसरणीतून बाजार सावरताना दिसत आहे. बँक आणि आयटी (माहिती-तंत्रज्ञान) समभागांमध्ये वाढ झाली असून वाहन, धातूमध्ये एक तृतीयांश टक्क्यांहून अधिक उसळी दिसून येत आहे.

मार्केट ओपनिंग कसे राहिले
आजच्या व्यवहारात बीएसईचा ३० समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स १०७.४० अंक किंवा ०.१८ टक्क्यांनी वाढल्यानंतर ६०,४५४ वर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, NSE चा निफ्टी ४२.६० अंक किंवा ०.२४ टक्क्यांनी वाढल्यानंतर १८,०४६ वर व्यवहार करताना दिसत आहे.

टाटा समूहाच्या स्टॉकने गुंतवणूकदार सुखावले, बाजारात उलथापालथ तरीही दोन दिवसांत दिला भरघोस रिटर्न
प्री-ओपनिंगमध्ये व्यापार कसा होता?
आज देशांतर्गत शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगली वाढ झाली. बीएसई सेन्सेक्स ११३ अंकांनी वधारत ६०४६० च्या पातळीवर तर निफ्टी ४१ अंकांच्या वाढीनंतर १८०४५ ची पातळीवर दिसत आहे.

अमेरिकी शेअर बाजाराची स्थिती
त्याचवेळी बुधवारी अमेरिकन बाजारही मजबूत बंद झाले. बुधवारी Nasdaq ०.७४ टक्क्यांनी वाढून ११,७१९.६८ च्या पातळीवर बंद झाला. S&P ५०० निर्देशांक ०.३४ टक्क्यांनी वाढून ३,९४६.०१ वर बंद झाला. तर डाऊ जोन्समध्ये ३० अंकांची मजबूती दिसली आणि तो ३१,१३५.०९ च्या पातळीवर बंद झाला.

शेअर बाजारातून बंपर कमाईची संधी, लवकरच ‘या’ कंपन्या डिविडंड देणार
निफ्टीत कोणाला फायदा, कोणाला नुकसान?
यादरम्यान सेन्सेक्समधील ३० पैकी २७ समभागांमध्ये वाढ झाली. मारुतीच्या शेअरमध्ये सुमारे २ टक्क्यांची कमाल वाढ दिसून आली. अदानी पोर्ट्स, कोटक बँक, श्री सिमेंट, मारुती आणि आयसीआयसीआय बँक हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअर्समध्ये ३ टक्के आणि फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये २ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. एसबीआयमध्येही मोठी ताकद दिसून येत आहे. त्याचवेळी, हिंडाल्को, इन्फोसिस, टाटा स्टील, इंडसइंड बँक आणि हिरो मोटोकॉर्प यांना निफ्टीत सर्वाधिक नुकसान झाले.

१०० रुपयांपेक्षा स्वस्त शेअर देईल तगडा रिटर्न, गुंतवणूकदारांना दमदार परताव्याची संधी
चार दिवसाच्या तेजीला ब्रेक
याआधी बुधवारी चार दिवसांपासून शेअर बाजारातील तेजीचा कल थांबला. बुधवारी सकाळी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला आणि नंतर रिकव्हरी झाली पण सेन्सेक्स २२४ अंकांनी घसरून बंद झाला. व्यवहाराच्या सत्राअखेर बीएसईचा ३० समभागांचा सेन्सेक्स २२४ अंकांनी घसरून ६०,३४६.९७ वर बंद झाला. तर ५० अंकांचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ६६.३० अंकांनी घसरून १८,००३.७५ अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here