मुंबई : महाविकास आघाडी सरकारने एलोक्यन्स मीडिया प्रा. लिमिटेड कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं होतं. घालून दिलेले नियम न पाळल्याने एलोक्यन्स कंपनीला सरकारने दणका देत मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थगित केला होता. मात्र नियम न पाळणाऱ्या कंपनीला महाविकास आघाडीने ब्लॅकलिस्ट करुनही शिंदे फडणवीस सरकारने संबंधित कंपनीला मुदतवाढ दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती करणाऱ्या एलोक्यन्स मीडिया प्रा. लिमिटेड कंपनीने चित्रपट तयार करण्यास दिरंगाई करुनही शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा एकदा कंत्राट दिलंय. या चित्रपटाची निर्मिती करताना कंपनीने अनेकदा नियमांचं उल्लंघन केल्याने कंपनी अनेकदा वादात सापडली होती. मागील ठाकरे सरकारने या कंपनीला मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थगित केला, मात्र सत्तांतर होताच शिंदे फडणवीस सरकारने या कंपनीला मुदतवाढ दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

महाविकास आघाडी सरकारने एलोक्यन्स मीडिया प्रा. लिमिटेड कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं होतं. घालून दिलेले नियम न पाळल्याने एलोक्यन्स कंपनीला सरकारने दणका देत मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थगित केला होता. मात्र नियम न पाळणाऱ्या कंपनीला महाविकास आघाडीने ब्लॅकलिस्ट करुनही शिंदे फडणवीस सरकारने संबंधित कंपनीला मुदतवाढ दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

पंतप्रधान मोदी शिंदेंना म्हणाले, त्या कंपनीला महाराष्ट्राच्या सत्तांतराची कल्पना कशी असेल?
राज्य सरकारने महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती करण्यासाठी एलोक्यन्स मीडिया प्रा. लिमिटेड कंपनीला कंत्राट दिलं आहे. २० कोटी रुपयांचं हे कंत्राट आहे. राज्य सरकार पैसे देणार असलं तरी चित्रपटाचे सर्व अधिकार हे खासगी कंपनीकडे असणार आहेत. दुसरीकडे कंपनीला कंत्राट दिल्यानंतर संबंधित कंपनीबाबत अनेक नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. कंत्राट तर दिलं परंतु कंपनीची निवड होणत्या निकषांआधारित केली? याचा कोणताही आधार समोर येऊ शकलेला नाहीये. कंपनीच्या निर्मितीत अनियमितता आणि भ्रष्टाचार असल्याचा आरोप आहे. या कंपनीशी करार केलेली फाईल गहाळ कशी झाली? याबाबतही संभ्रम आहे.

करार झाल्यानंतर एका वर्षात चित्रपट पूर्ण झाला नाही तर कंपनीला रोज एक लाख रुपये दंड आकारला जाणार होता मात्र चार वर्षानंतरही चित्रपट निर्मितीला सुरुवात झाली नाही, मग असं असतानाही राज्य सरकारने कंपनीला दंड का केला नाही? असा सवाल उपस्थित होतोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here