वाचा:
‘ हे महाराष्ट्राला झालेला करोना आहेत. त्यांच्याकडं कुठलीही व्हिजन नाही. त्यांनी छोट्या समूहांचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेतला, असं वक्तव्य भाजपचे विधान परिषदेतील आमदार यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावरून राजकीय वादंग माजलं होतं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं पडळकरांच्या तोंडाला काळं फासण्याचा व चोप देण्याचा इशारा दिला होता. त्यामुळं वातावरण तापलं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व प्रवीण दरेकर यांनी पडळकर यांचं वक्तव्य चुकीचं आहे. त्यांच्या मताचा भाजपशी संबंध नसल्याचं सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नीलेश राणे यांनी राष्ट्रवादीवर तोफ डागली आहे.
वाचा:
राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेल्या इशाऱ्यांवर त्यांनी प्रतिइशारा दिला आहे. ‘पडळकरांच्या त्या वक्तव्याचं मी समर्थन करत नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या किंवा कार्यकर्त्यांच्या अंगावर कोणी जाणार असेल तर लक्षात ठेवा. आम्हाला धमक्या देऊ नका. जशास तसे उत्तर देऊ,’ असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘राष्ट्रवादीवाल्यांकडं गृहखातं असल्यानं त्यांना मस्ती आली आहे. पण आमचा पक्ष महाराष्ट्रात सर्वात मोठा आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. आज जिथं तुम्ही आहात तिथं उद्या आम्ही असू शकतो,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
‘मोदी साहेबांवर
किती वेळा नाय नाय त्या घाणेरड्या भाषेत राष्ट्रवादीवाले आणि काँग्रेसवाले बोलले आहेत,’ याची आठवणही नीलेश राणे यांनी करून दिली आहे.
पडळकर समजूतदार कार्यकर्ते
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या प्रकरणी भाष्य केलं आहे. गोपीचंद पडळकर हे समजूतदार कार्यकर्ते आहेत. त्यांना पवारांबद्दल काही अनुभव असेल त्यावरून ते बोलले असतील. पवारांचा अनादर करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. पण त्यांची भाषा चुकीची होती. देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांना समज दिली आहे,’ असं पाटील यांनी म्हटलं आहे.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines