यवतमाळ : जुन्या वादातून दोन युवकांनी पोलीस मुख्यालयासमोरच पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केली आहे. ही घटना बुधवारी रात्री यवतमाळ जिल्ह्यात घडली असून खून प्रकरणाने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. निशांत खडसे असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसंच याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या हत्येप्रकरणी पुढील तपास सुरू असून पोलीस कर्मचाऱ्याचा मुख्यालयाजवळच खून झाल्याने शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.