नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांच्या सोयीसाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. आगाऊ कर (Advance Tax) ही अशीच एक तरतूद आहे. कोणत्याही करदात्याला, ज्यांचे कर दायित्व १० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना आगाऊ कर भरणे बंधनकारक आहे. यामुळे सरकारलाही मदत होते आणि करदात्यांनाही अनेक फायदे मिळतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही देखील या श्रेणीत येत असाल तर आजची तारीख तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

पुढील मूल्यांकन वर्षासाठी अ‍ॅडव्हान्स टॅक्स (Advance Tax Payment Deadline) चा दुसरा हप्ता भरण्याची आज शेवटची तारीख आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल.

पगाराचा मोठा हिस्सा इन्कम टॅक्समध्ये जातोय? दुसऱ्या गृहकर्जावर सवलतींचा पाऊस, जाणून घ्या सविस्तर
करदात्याला मिळतो कोणता लाभ?
त्याला आगाऊ कर म्हणतात कारण तो आर्थिक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी भरला जातो. साधारणपणे आर्थिक वर्षात कमावलेल्या उत्पन्नावर वर्षाच्या शेवटी आयकर भरला जातो. पण करदात्यांना एकाच वेळी मोठ्या कराचा बोजा सहन करावा लागू नये ही बाब लक्षात घेऊन आगाऊ कराची व्यवस्था करण्यात आली आहे. या अंतर्गत करदाता स्वतःचे मूल्यांकन करतो आणि त्याच्या सोयीनुसार आगामी मूल्यांकन वर्षासाठी त्याच्या अंदाजे दायित्वाचा एक भाग अ‍ॅडव्हान्स भरतो. नंतर जेव्हा आयकर भरण्याची वेळ येते तेव्हा तो उरलेली रक्कम भरून मुक्त होऊ शकतो. सोप्या शब्दात सांगायचे तर, एकाच वेळी प्रचंड कर भरण्याऐवजी तुकड्यांमध्ये कर भरण्याच्या सुविधेला अ‍ॅडव्हान्स टॅक्स म्हणतात.

करदात्यांनो, तुमची एक छोटीशी चूक महागात पडेल; कर सवलतीचा पूर्ण फायदा घेण्यासाठी ही खबरदारी घ्या
१५ सप्टेंबरपूर्वी अ‍ॅडव्हान्स कर कोणी भरावा?
जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल परंतु उत्पन्नाचे इतर स्त्रोत असेल तर तुम्हाला आगाऊ कर भरावा लागेल. पगाराच्या उत्पन्नावर कर्मचाऱ्याच्या वतीने नियोक्त्याद्वारे आगाऊ कर भरला जातो. त्याचप्रमाणे, जर तुम्ही पगारावर अवलंबून नसाल परंतु तुमच्या उत्पन्नाचे इतर स्रोत जसे की भांडवली नफा, भाडे किंवा मुदत ठेव असेल तर तुम्हाला तुमच्या उत्पन्नावर आगाऊ कर भरावा लागेल. याशिवाय असा कोणताही करदाता, ज्याचे आर्थिक वर्षातील कर दायित्व १- हजार रुपये किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना आगाऊ कर भरावा लागेल. मग तो नोकरी करत असेल, व्यवसाय चालवत असेल किंवा कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असेल.

अ‍ॅडव्हान्स टॅक्स करदात्याने एकत्रित न भरता प्रत्येक तिमाहीत भरावा लागतो. आयकर कायद्यानुसार, करदात्याला स्वत: संपूर्ण आर्थिक वर्षाच्या कमाईची गणना करावी लागते. या गणनेच्या आधारे विशिष्ट अंतराने कर भरावा लागतो. म्हणजेच ज्या आर्थिक वर्षात तुम्ही कमाई करत आहात त्या दरम्यान आयकर भरला जातो.

करदात्यांना दिलासा! IT विभागाने जारी केला १.१४ कोटींचा परतावा, अशाप्रकारे जाणून घ्या तुमचे स्टेटस
चार हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा
आगाऊ कर चार हप्त्यांमध्ये भरला जातो. पहिल्या हप्त्याची शेवटची तारीख १५ जून, दुसरी १५ सप्टेंबर, तिसरी १५ डिसेंबर आणि शेवटच्या हप्त्याची अंतिम तारीख १५ मार्च आहे. पात्र करदात्यांनी १५ जूनपर्यंत एकूण कराच्या १५ टक्के आगाऊ कर म्हणून जमा करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे करदात्याने १५ सप्टेंबरपर्यंत ४५ टक्के, १५ डिसेंबरपर्यंत ७५ टक्के आणि १५ मार्चपर्यंत १०० टक्के कर भरावा लागेल.

मुदत चुकल्यास दंड आकारला जाईल
आगाऊ कर वेळेवर न भरल्याने करदात्याच्या खिश्याचा भार वाढेल. वेळेवर कर भरण्यात अयशस्वी झाल्यास कलम २३४बी आणि कलम २३४सी अंतर्गत व्याज भरावे लागेल. समजा तुम्ही १५ सप्टेंबरची अंतिम मुदत चुकवली तर तुम्हाला तीन महिन्यांसाठी व्याज द्यावे लागेल, जे दरमहा १ टक्के आहे. जर करदात्याने जास्त आगाऊ कर भरला असेल, तर तो आयकर रिटर्न भरून परतावा मागू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here