बलिया: उत्तर प्रदेशच्या बलियामधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक व्यक्ती कॅमेऱ्यासमोर खड्ड्यांच्या समस्येवर बोलत असताना त्याचवेळी त्याच्या मागे एका रिक्षाला खड्ड्यांमुळे अपघात झाला. कॅमेऱ्यावर बाईट देत असतानाच हा प्रकार घडला. खड्ड्यांमुळे होणाऱ्या समस्यांवर बोलत असतानाच ही घटना घडली. त्यामुळे नागरिक सांगत असलेली समस्या आणि अपघात एकाचवेळी कॅमेऱ्यात कैद झाला.

खड्ड्यांमुळे रस्त्यावर अपघात होतात. जवळपास रोजच या रस्त्यावर ई-रिक्षांना अपघात होतात. रिक्षा पलटल्यानं प्रवाशी जखमी होतात, अशा समस्या नागरिक पत्रकाराला कॅमेऱ्यावर सांगत होता. त्याचवेळी त्याच्यामागे एका रिक्षाला अपघात झाला. प्रवाशांना घेऊन जाणारी ई-रिक्षा खड्ड्यांमुळे अचानक उलटली. योगायोगानं हा प्रकार घडला आणि तो त्याचं थेट प्रक्षेपण झालं.

एक पत्रकार बलियातील रस्त्यांच्या अवस्थेचं वार्तांकन करत होता. त्यावेळी प्रविण कुमार नावाच्या स्थानिकाकडे त्यानं खड्ड्यांबद्दल विचारणा केली. त्यावर कुमार यांनी खड्ड्यांमुळे होणाऱ्या समस्यांचा पाढाच वाचला. ‘हा बलियामधील मुख्य रस्ता आहे. शांती रुग्णालय आणि गोरख रुग्णालयाच्या मध्ये एक मोठा खड्डा आहे. हा खड्डा समस्यांचं केंद्र झाला आहे. कित्येक वर्षांपासूनची ही समस्या आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्याला याची चिंता नाही. इथे रोज अनेक ई-रिक्षा उलटतात. लोकांचे हात-पाय मोडतात. अनेकजण घसरतात,’ अशा शब्दांत कुमार यांनी समस्या मांडल्या.
टाईल्स लावले, पण घरमालक पैसे देईना; मिस्त्रीनं पेट्रोल टाकून घराबाहेरची मर्सिडीज पेटवली
स्थानिकांनी या प्रकरणी लिखित तक्रार दाखल केली आहे का, असा प्रश्न पत्रकारानं कुमार यांना विचारला. या प्रश्नाला कुमार उत्तर देत असताना त्यांच्या मागे असलेल्या रस्त्यावरून जात असलेली एक ई-रिक्षा खड्ड्यामुळे उलटली. तिथे उपस्थित असलेले लोक लगेच मदतीसाठी धावले. त्यांनी ३-४ जणांना रिक्षातून बाहेर काढलं. त्यांना दुखापत झाली होती.

अपघातानंतर कॅमेऱ्यात आसपासचा आवाज कैद झाला. अशा प्रकारच्या घटना रोज घडत असल्याचं काही जण म्हणत होते. अपघातात जखमी झालेली महिला रडत होती. तिनं फोन करून अपघाताची माहिती निकटवर्तीयांना दिली. अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here