रशियाच्या अध्यक्षांचा व्हिसा फ्री योजनेला पाठिंबा आहे. इराणसाठीच्या व्हिसा फ्री योजनेला आधीच हिरवा कंदिल मिळाला आहे. आता भारतीयांसाठी ही योजना लवकरच सुरू होईल, अशी आशा आहे. तुर्कस्तान, जर्मनी आणि भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक रशियात येतात, असं अलीना यांनी सांगितलं.
२०२० मध्ये भारतासह ५२ देशांसाठी इलेक्ट्रॉनिक व्हिसा सुरू करण्याचा प्रस्ताव पारित झाला. मात्र करोना संकटामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. तो लवकरच लागू होईल. ई-व्हिसामुळे परदेशी पर्यटकांच्या आगमनाची प्रक्रिया सोपी होईल, असं अलीना यांनी म्हटलं.
जगभरात अनिश्चिततेचं वातावरण आहे. अशा स्थितीत पर्यटनामुळे लोक जोडले जातात. पर्यटन पुलासारखं काम करतं. संस्कृतींना जोडतं. यंदाच्या वर्षात पहिल्या ६ महिन्यांत १३ हजार ३०० भारतीय पर्यटक रशियात आले. २०२३ पर्यंत हा आकडा आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. करोना आधी जशी परिस्थिती होती, जितके पर्यटक भारतातून रशियात येत होते, तोच आकडा २०२३ पर्यंत गाठला जाईल, अशी आशा त्यांनी बोलून दाखवली.