russia putin car attacked with bomb: युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू असताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. रशियन अध्यक्षांचं कार्यालय असलेल्या क्रेमलिनमधील सुत्रांनी याबद्दलची माहिती दिली आहे. पुतीन यांच्या लिमोझिन कारवर बॉम्बनं हल्ला झाला. त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला.

ब्रिटिश वृत्तपत्र द सननं दिलेल्या वृत्तानुसार, पुतीन यांच्या हत्येचा प्रयत्न नेमका कधी झाला त्याबद्दलची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. या दाव्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. पुतीन यांचा ताफा मार्गक्रमण करत असताना एक किलोमीटर रुग्णवाहिकेनं एक कार थांबवली. ही ताफ्यातील पहिली कार होती. त्यावेळी पुतीन यांच्या कारच्या डाव्या बाजूला जोरदार आवाज झाला आणि धूर पसरला.
पुतीन यांची नियंत्रित करताना अडचणी येत होत्या. त्यांची कार घटनास्थळावरून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आली. युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला जबर नुकसान सहन करावं लागलं आहे. त्यावरून पुतीन यांच्यावर बरीच टीका होत आहे. त्याच सुमारास पुतीन यांच्यावर जीवघेण हल्ला झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. युक्रेनच्या सैनिकांनी रशियन फौजेला मागे ढकलून ६ हजार वर्ग किमी परिसर मोकळा केल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.