Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 15, 2022, 6:29 PM
Accident News : आज पहाटे कोल्हापूरहून माजलगावला जाणारी एसटी बसचा चंद्रभागेच्या पुलावर येत असताना अचानक टायर फुटला आणि बसचे नियंत्रण सुटले. मात्र, चालकाच्या सावधानतेमुळे त्याने बस पुलाच्या कडेला असणाऱ्या डिव्हायडरला धडकावल्याने बस थांबली आणि चंद्रभागेत कोसळण्यापासून वाचली.

हायलाइट्स:
- ५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटीचा टायर फुटल्याने अपघात
- पंढरपुरातील चंद्रभागा नदीवर झाला भीषण अपघात
- सुदैवाने कोणालाही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही.
कोल्हापूर आगाराची एसटी बस माजलगावहून कोल्हापूरकडे जात असताना हा अपघात झाला. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीवर बसचा पुढील टायर फुटल्याने ही घटना घडली आहे. यात बस पुलाच्या संरक्षक कठड्यावर आदळली. या दरम्यान चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. आज पहाटे सहाच्या सुमारास ही बस निघाली असता अंबाबाई पटांगणातील नवीन पुलावर अचानक बसचे टायर फुटले. यामुळे बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस कठड्याच्या दिशेनं गेली. मात्र, ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे ही बस पुलावर असलेल्या कठड्यावर धडकल्याने मोठा अनर्थ टाळला आहे. या बसमध्ये ५० प्रवासी होते. जर या पुलाला लोखंडी बॅरिकेटिंग आणि कठडे नसते तर बस नदीत कोसळली असती.
आज पहाटेच्या सहाच्या सुमारास ही बस निघाली असता अंबाबाई पटांगणातील नवीन पुलावर अचानक बसचे टायर फुटले. यामुळे बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस कठड्याट्या दिशेने गेली. मात्र, ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे ही बस पुलावर असलेल्या कठड्यावर धडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या बसमध्ये पन्नास प्रवासी होते. जर या पुलाला लोखंडी बॅरिकेटिंग आणि कठडे नसते तर बस नदीत कोसळली असती. बस चालकानेही सतर्कता दाखवल्यामुळे ५० प्रवाशांचा जीव वाचला आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.