पुणे : वेदांत फॉक्सकॉन प्रोजेक्ट जाण्यामागे दोन्ही सरकार जबादार आहेत. आता फक्त मेलेल्या मुडद्यावर रडण्याचे काम सुरू आहे. प्रोजेक्ट गुजरातला गेला असा आता म्हणायला हरकत नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

महाराष्ट्र मध्ये काल पासून चर्चेत रंगलेला विषय म्हणजे वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरात मध्ये नेण्यात आला. मात्र, या मुद्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. अनेक मोर्चे आणि आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदवला जातो. मात्र, सत्ताधारी बरोबर उलट महाविकास आघाडीवर टीका करत आहे. महाविकास आघाडीच्या काळात हा प्रकल्प आला असून त्यांच्या काळात पूर्तता झाली नाही म्हणून हा प्रकल्प गुजरातला द्यावा लागला.

संभाजीराजे मंत्रालयातून निघून गेल्याच्या चर्चा, अखेर मुख्यमंत्र्याची भेट झालीच, ‘या’ मुद्यांवर चर्चा
मात्र, या सत्ताधारी आणि विरोधकांच्या कारभारावर निशाणा साधला आहे. हा प्रकल्प जाण्यासाठी महाविकास आघाडी ही तितकीच जबाबदार आहे जितके आत्ताचे शिंदे भाजप सरकार. आता हे फक्त मुडद्यावर रडगाणं चालू आहे असा मला वाटतं, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

वेदांतच प्रकल्प हा महाराष्ट्र मध्ये कुठल्या दिवशी आला तो महत्वाचा आहे. माझ्या माहिती प्रमाणे वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प हा महाराष्ट्र विकास आघाडी सरकार असताना आला आहे. तो त्यांनी क्लोजर केला नाही. तो प्रकार शिंदे सरकारकडून झाला त्यांनी ही क्लोजर केला नाही. म्हणून त्या ठिकाणी गुजरातने हात घालून तो प्रकल्प गुजरात ला घेऊन गेला आहे असा म्हणल्या हरकत नाही. त्यांनी त्या ठिकाणी MOU पण साईन केला आहे. म्हणून हा प्रोजेकॅक्ट कायमचा गेला असा बोलायला हरकत नाही. आता फक्त माङया वरच रडगाणं सुरू आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि हा प्रोजेक्ट जाण्या मागे दोनी सरकार जबादार आहे
Dhule News : हनुमानाच्या मूर्तीची विटंबना, चांदीचा डोळा केला लंपास; धुळ्यातील घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here