काही तासांनंतर वृद्धाला एका अज्ञात नंबरवरून कॉल आला. समोरील व्यक्तीनं आपण दिल्ली पोलीस दलातील आयपीएस अधिकारी राहुल अहिरवार असल्याचं सांगितलं. महिलेसोबतच्या तुमच्या व्हिडीओ कॉलची रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. मला ३० हजार ५०० रुपये न मिळाल्यास व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करेन, अशी धमकी त्यानं दिली आणि बँक खात्याचा तपशील दिला.
बँक खात्यात पैसे जमा करा, अन्यथा तुमच्याविरोधात एफआयआर दाखल करू, अशी धमकी बोगस अधिकाऱ्यानं वृद्धाला दिली. घाबरलेल्या वृद्धानं सांगण्यात आलेली रक्कम बँकेत जमा केली. यानंतर वृद्धाला आणखी एका अज्ञात नंबरवरून कॉल आला. फोन केलेल्या व्यक्तीनं आपण पत्रकार असल्याचं सांगितलं. बँक खात्यात ५० हजार रुपये जमा करा, अन्यथा तुमचा व्हिडीओ कॉल सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी बोगस पत्रकारानं दिली.
बदनामी टाळण्यासाठी वृद्धानं बँक खात्यात ५० हजार जमा केले. यानंतर आरोपींनी वृद्धाला आणखी लुबाडले. आरोपींनी वृद्धाकडून २.२१ लाख रुपये उकळले. यानंतरही आरोपींचे फोन येत असल्यानं अखेर वृद्धानं पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.