अजित पवार आमदार संजय गायकवाड यांची नक्कल करत म्हणाले, ‘ शिवसेना के लोग पातळी छोड कर बात कर रहे हैं. आज तो राडा बहोत कम हो गया. पोलिसने रोक लिया. उनको पता नही हैं की संजय गायकवाड और उसके कार्यकर्ता कितने पागल हैं. ये आग्यामोहोळ की तरह डसनेवाले कार्यकर्ता हैं. हे यांचं हिंदी बंरं का… अगर वो खवळ जाते है तो किसी के बाप को बाप समझते नहीं…अरे पक्या…अगर इसके बाद इन्होने कुछ भानगड करने का प्रयास किया तो चुनचुन के मारेंगे, गिनगिन के मारेंगे… वो तो सौभाग्य है की पुलीस बिच में थी’
पवार पुढे म्हणाले की, हिंदी भाषेचा तर सत्यानाश केला. हिंदी भाषाही म्हणत असेल या आमदाराला बास बास बास…असाही टोला अजित पवार यांनी लगावला. काय चाललंय, कसा महाराष्ट्र पुढे जाईल, अशा हिंदीचा सत्याचाश करणाऱ्या लोकांना सांगून महाराष्ट्राचा विकासासाठी प्रयत्न करणार का ? असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.
तर सांगोल्याचे आमदार यांचाही, ‘काय झाडी, काय डोंगार, एकमद ओके, असे म्हणत अजित पवार यांनी समाचार घेतला. यामुळे महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राबाहेरही राज्याची बदनामी झाली आहे, यामुळे हसू येते, पण महाराष्ट्राची किती नाचक्की होते, काश्मिर ते कन्याकुमारी पर्यंत कुणाची महाराष्ट्राकडे बघण्याची हिंमत होत नव्हती. मात्र आता हे काय चालंलय,असे म्हणत अजित पवार यांनी शिंदे गटाच्या आमदारांचा समाचार घेतला.
शिंदे गटातील एका आमदाराने गोळीबार केला, तर एका आमदाराने थेट हात पाय तोडण्याची भाषा केली आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा पध्दतीने वक्तव्य करणाऱ्या आमदारांना किमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरी बोललं पाहिजे, असेही अजित पवार पुढे म्हणाले.