परभणी शहरातील बी रघुनाथ सभागृह येथे युवा सेना पदाधिकारी मेळावा पार पडला. यावेळी आमदार राहुल पाटील यांच्यासह जिल्हाप्रमुख विशाल कदम आदींची उपस्थिती होती. यावेळी युवासेना सचिव वरुण सरदेसाई बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की सध्या जे काही घडत आहे ते खूप गंभीर आहे. सगळ्यात अगोदर शिवसेनेसोबतची युती तोडली तिथपर्यंत ठीक होतं. तो त्यांच्या पक्षाचा विषय होता. नंतर शिवसेना पक्ष फोडला. ज्या लोकांच्या मदतीने फोडला त्यांच्याकडून शिवसेना मूळ पक्षावर दावा करण्यात आला.
आम्ही शिवसैनिक म्हणायचं आणि कोर्टामध्ये धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करायची.मागील तीन दिवसात खाली बातमी आली भाजप, गद्दारचा गट,आणि माणसे एकत्र येणार आणि शिवसेना, उध्दव ठाकरे यांना एकट पडण्याचे प्रयत्न करणार मी खात्रीने सांगतो तीन काय तीस पक्ष एकत्र आले तरी महापालिकेवरचा शिवसेनेचा भगवा उतरू शकणार नाहीत. हे काय करू इच्छितात काय करू पाहतात हे समजून घ्या उद्या यांचा महापौर झाला तर केवळ शिवसेना नाही तर मराठी माणूस संकटात येईल, असं वरुण सरदेसाई म्हणाले.
मी जे बोलतोय ते अतिशय जबाबदारीने बोलत आहे.आज या नवीन सरकार मध्ये मुंबईचे किती मंत्री आहेत.एक आहे तो सुद्दा अमराठी आहे. मुंबईतील ३६ आमदारांमधून त्यांना एकही आमदार मराठी सापडला नाही.आज भाजपचे मुंबई मध्ये तीन खासदार आहेत त्यापैकी दोन अमराठी आहेत.भाजपचे 13 आमदार आहेत. त्यापैकी 8 अमराठी आहेत. भाजपचे मुंबई मध्ये 82 नगरसेवक आहेत.त्यापैकी 50 ते 55 नागरसेवक अमराठी आहेत, असं वरुण सरदेसाई म्हणाले.