अंबरनाथ : मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलनं मागील महिन्यात मोठी कारवाई करत २ हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणाचा भांडाफोड केला होता. या प्रकरणात आता अंबरनाथ एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलनं ऑगस्ट महिन्यात नालासोपारा आणि गुजरातमधून मिळून १ हजार २१८ किलो एमडी ड्रग्ज जप्त केलं होतं. या प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या प्रेम प्रकाश सिंग याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. विज्ञान शाखेतील ऑरगॅनिक केमिस्ट्रीचा पदवीधर असलेला सिंग हा स्वतः हे ड्रग्ज तयार करत होता. त्याच्या चौकशीत त्यानं अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील नमाऊ केम या केमिकल कंपनीत ड्रग्ज तयार केल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार अँटी नार्कोटिक्स सेलनं या कंपनीवर छापा टाकला होता. तेव्हापासून या कंपनीचा मालक असलेला जीनेंद्र व्होरा हा अँटी नार्कोटिक्स सेलच्या रडारवर होता.

विरोधकांच्या एकजुटीसाठी शिवसेनेचा पुढाकार, मविआ एकत्र लढल्यास ३५ जागा जिंकण्याचा विश्वास

जीनेंद्र व्होरा याच्याविरोधात सबळ पुरावे मिळताच पोलिसांनी त्याला १० सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावत बेड्या ठोकल्या. त्याच्या कंपनीतील व्यवस्थापक किरण पवार याला अँटी नार्कोटिक्स सेलनं यापूर्वीच अटक केली होती. दरम्यान, व्होरा याला विशेष एनडीपीएस कोर्टासमोर हजर करण्यात आलं असता त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती अँटी नार्कोटिक्स सेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे.

जुलै २०२१मध्ये चिपळूणमध्ये आलेला पूर नेमका कोणत्या कारणामुळे? अहवालातून समोर आलं खरं कारण

व्होरा याच्या कंपनीत प्रेम प्रकाश सिंग यानं चार वेळा एमडी ड्रग्ज तयार केलं आणि त्याच्या मोबदल्यात व्होरा याला मोठी रक्कम दिली गेली. तसंच कंपनीतील कर्मचाऱ्यांना याबाबत संशय आला होता, मात्र आपण काय तयार करत आहोत, याची माहिती व्होरा आणि त्याचा व्यवस्थापक किरण पवार याने कर्मचाऱ्यांनाही दिली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याच नमाऊ केम कंपनीतून एमडी ड्रग्जचे काही नमुने जप्त केल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here