नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकासदर ७.८ टक्के राहिल, असे सांगणाऱ्या ‘फिच रेटिंग्ज’ या पतमानांकन संस्थेने गुरुवारी मात्र हा अंदाज घटवला आहे. ‘फिच रेटिंग्ज’च्या ताज्या निरीक्षणानुसार, चालू आर्थिक वर्षअखेर आर्थिक विकासदर सात टक्के राहणार आहे.

अमेरिकेनंतर भारतात लगेचच व्याज दरवाढ का? जाणून घ्या महागाई, रेपो दर, रोखे आणि रुपया यांच्यातील कनेक्शन
फिच रेटिंग्ज म्हणते…

– जागतिक आर्थिक वातावरण मंदीचे आहे

– भारतीय अर्थव्यवस्थेची गती संथ होण्याची शक्यता आहे

– देशात चलनवाढ होत असून, ती आटोक्यात आणण्यासाठी पतधोरणात आणखी कठोर उपाय योजले जातील

– आर्थिक वर्ष २०२३-२४मध्येही आर्थिक विकास घसरेल आणि तो ६.७ टक्के नोंदवला जाईल. आधीचा अंदाज ७.४ टक्के होता

– ऑगस्टमध्ये चलनवाढ सुसह्य झाली आहे

– आंतरराष्ट्रीय तेल बाजारात क्रूड तेलाचे दर घसरल्याचा फायदा

अमेरिकेतील महागाईमुळे भारतीय शेअर बाजारात खळबळ, असे का? एका क्लिकवर समजून घ्या
अधिकृत आकडेवारी

– चालू आर्थिक वर्षात जून तिमाहीत आर्थिक विकास १३.५ टक्के झाला

– जानेवारी ते मार्च या तिमाहीत आर्थिक विकास ४.१० टक्के होता

– चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकास ७.२ टक्के राहील, असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज

– किरकोळ (रिटेल) महागाई दर सात टक्क्यांवर

– घाऊक दराधारित चलनवाढ १२.४१ टक्के. ही चलनवाढ ११ महिन्यांनंतर प्रथमच नीचांकी

– चलनवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने यंदा रेपो दर १.४० टक्के वाढवला आहे

– ऑगस्टमध्ये रेपो दर ५.४ टक्के

जनतेला बसणार आणखी आर्थिक झळ; RBI मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तुमच्या खिशावर थेट परिणाम कसा होणार?
जागतिक वातावरण

– या वर्षअखेर (२०२२अखेर) एका अमेरिकी डॉलरसाठी ७९ रुपये मोजावे लागतील

– वर्षअखेर भारतात किरकोळ महागाई दर ६.२ टक्के असेल

– पुरवठ्यातील अडथळे आणि चलनवाढ याचा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसत आहे

– चालू वर्षअखेर जगाचा जीडीपी २.४ टक्के वाढेल

– २०२३मध्ये जगाचा जीडीपी केवळ १.७ टक्क्यांनी वाढेल

– चालू वर्षाच्या अखेरीस युरोझोन व ब्रिटन यांना मंदीचा सामना करावा लागेल

– २०२३च्या मध्यात अमेरिकेला मंदीचा सौम्य झटका बसणार आहे

– चीनमध्ये आर्थिक विकास मंदावला आहे

– चीनमध्ये मालमत्तांच्या किमती घसरल्या आहेत

“येत्या काही महिन्यांत जागतिक अर्थव्यवस्थेत मोठ्या घडामोडी अपेक्षित आहेत. युरोपात संभाव्य भीषण इंधनटंचाई, व्याजदरांमध्ये वेगाने होणारी वाढ आणि चीनमधील मालमत्तांच्या घसरणाऱ्या किमती यांचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे” – ब्रायन कॉलटन, मुख्य अर्थतज्ज्ञ, फिच रेटिंग्ज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here