शेअर बाजारातून वाढलेली संपत्ती
गौतम अदानी यांची मालमत्ता सध्या १२ लाख कोटींच्या आसपास आहे. श्रीमंतांची संपत्ती वाढवण्यात किंवा कमी करण्यात शेअर बाजाराचा (Share Market) मोठा वाटा असतो. किंबहुना अदानी किंवा इतर कोणत्याही अब्जाधीश उद्योगपतीच्या संपत्तीची गणना करताना त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सचे मूल्यही जोडले जाते. आता शेअर बाजारात शेअर्सच्या किमती वाढल्या तर अदानींची मालमत्ताही वाढणार आहे.
कंपन्यांचे उत्पन्न कमी
अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले की गौतम अदानी यांची संपत्तीही वाढेल. मात्र, कंपन्या किती उत्पन्न मिळवत आहेत हे श्रीमंताची श्रीमंती तपासण्याचे सूत्र बाजार भांडवलापेक्षा चांगले मानले जाते. या सूत्रानुसार अदानी यांच्या मालमत्तेकडे पाहिल्यास त्यांच्या कंपन्यांवरील कर्ज हा मोठा प्रश्न आहे. त्यांच्या कंपन्यांचे उत्पन्नही तेवढे नाही.
फॉर्च्यून मॅगझिन ग्लोबल ५०० यादी
फॉर्च्यून मॅगझिनच्या ग्लोबल ५०० यादीत कंपन्यांचा समावेश त्यांच्या कमाईच्या आधारावर होतो. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे या यादीत अदानींच्या एकाही कंपनीचा समावेश नाही. यावरून अंदाज लावता येतो की, अदानी यांची खरी संपत्ती शेअर बाजारात त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या वाढीमुळे वाढली आहे. त्यांच्या कंपन्यांच्या महसुलातून नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स घसरले तर साहजिकच अदानींची संपत्तीही कमी होईल.
११०० टक्क्यांची वाढ
अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गेल्या २ वर्षांत सुमारे ११०० टक्क्यांची वाढ झाली आहे. यापैकी अदानी एंटरप्रायझेस ७३० टक्के, अदानी ट्रान्समिशन ५०० टक्क्यांहून अधिक आणि अदानी पोर्ट ९६ टक्क्यांहून अधिक वाढले आहे. या कालावधीत सेन्सेक्स केवळ ४० टक्क्यांनी वाढला आहे.
भारतातील फक्त ९ कंपन्या
फॉर्च्युन ग्लोबल ५०० यादीत भारतातील ९ कंपन्यांचा समावेश आहे. महसुलाच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी कंपनी एलआयसी (LIC) आहे. एलआयसी देशातील सर्वात मोठी आणि सरकारी विमा कंपनी आहे. ५०० कंपन्यांच्या यादीत LIC ९८ व्या, रिलायन्स इंडस्ट्रीज १०४ व्या, इंडियन ऑइल १४२ व्या, ONGC १९० व्या, ACBI २३६ व्या, BPCS २९५ व्या, टाटा मोटर्स ३७० व्या, टाटा स्टील ४३५ व्या आणि राजेश एक्सपोर्ट्स ३४८ व्या स्थानावर आहे.
चीन पहिल्या स्थानावर
या यादीत १४५ कंपन्यांसह चीन पहिल्या, अमेरिका १२४ कंपन्यांसह दुसऱ्या, जपान ४७ कंपन्यांसह तिसऱ्या, जर्मनी २८ कंपन्यांसह तिसऱ्या, फ्रान्स २५ कंपन्यांसह चौथ्या आणि यूके (इंग्लंड) १८ कंपन्यांसह पाचव्या क्रमांकावर आहे.