Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 16, 2022, 1:15 PM
Aurangabad News : पुणे येथे हवालदार पदावर कर्तव्य बजावत असलेल्या सैनिकाचे हृदयविकाराच्या धक्क्याने काल सकाळी निधन झाले. सुनील जाधव यांच्या निधनाची बातमी गावात पसरताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला.

हायलाइट्स:
- पुण्यात हवालदार पदावर कर्तव्य बजावत असलेल्या सैनिकाचे निधन
- हृदविकाराच्या झटक्याने निधन
- औरंगाबादेतील पिशोरी येथील घटना
पिशोर येथील सुनील दादाराव जाधव हे शिपाई ऑक्टोबर २००८ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले. लष्कारात बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप सेंटर पुणे येथे हवालदार म्हणून कर्तव्य बजावत असताना सकाळी हृदविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज पिशोरच्या पिशोर येथून कोळंबी रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुनीलने देशात अनेक ठिकाणी देशाच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडली होती. गेल्या अडीच वर्षांपासून तो पुण्यात ड्युटीवर होता. इथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्याला आपला जीव गमावावा लागला. मनमिळाऊ स्वभावाच्या जवानाच्या इतक्या कमी वयात हृदयविकाराने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सुनीलच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन भाऊ, मेहुणे असा परिवार आहे.
आग्यामोहोळ की तरह खवळ जाते हैं… अरे पक्या; अजित पवारांनी उडवली आमदार गायकवाडांची खिल्ली
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
However, using lower doses of 5 20 mg daily over three weeks does not appear to improve depression does viagra stop you coming DO NOT assume that just because you purchased similar supplements in the past, they will have the same effect