शांघाय सहकार्य संस्थेच्या (एससीओ) बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुराच्या संकटात सापडलेल्या पाकिस्तानला खुली ऑफर दिली आहे. भारताकडे ७० हजारहून अधिक स्टार्टअप्स आहेत आणि त्यांचा अनुभव एससीओ देशांच्या कामी येऊ शकतो. आम्ही आमच्याकडे असलेला अनुभव शेजारच्या देशांसोबत शेअर करण्यास तयार आहोत, असं मोदी म्हणाले.

प्रत्येक क्षेत्रात आम्ही नवनिर्मितीला प्रोत्साहन देत आहोत. आमच्याकडे ७० हजारहून अधिक स्टार्टअप आहेत. त्यातील १०० पेक्षा अधिक युनिकॉर्न आहेत. आमचा हा अनुभव अनेक सदस्य देशांच्या कामी येऊ शकतो. या हेतूनं एक नवा विशेष कार्यकारी गट आम्ही स्थापन करत आहोत. स्टार्टअप आणि नवनिर्मितीसाठी हा गट काम करेल. आपल्याकडे असणारा अनुभव हा गट एससीओच्या सदस्य देशांसोबत शेअर करेल, असं मोदींनी म्हटलं.
पाकिस्तानात सध्या भीषण पूरपरिस्थिती आहे. त्यामुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. आधीच अर्थव्यवस्थात खिळखिळी झाली असताना आता पुरामुळे पाकिस्तान आणखी मोठ्या संकटात सापडला आहे. शेजारी देश दिवाळीखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत मोदींनी पाकिस्तानला मदतीचा प्रस्ताव दिला आहे. यावर पाकिस्तान सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.