Crime News : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये पोलिसांच्या पथकाने एका स्पा सेंटरवर छापा टाकून २० तरुण-तरुणींना अटक केली. पोलिसांनी सर्वांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई केली आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली अनेक महिन्यांपासून हे अनैतिक काम सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

 

Crime News
Crime News : ७ मुली, १३ मुलं; स्पा सेंटरवर छापा, समोरचं दृश्य पाहून पोलिसही चक्रावले

हायलाइट्स:

  • पोलिसांचा स्पा सेंटरवर छापा
  • ७ मुली आणि १३ मुलांना घेतलं ताब्यात
  • मध्य प्रदेशातील इंदोरमधील घटना
इंदोर : मध्य प्रदेशातील इंदूरमधील पलासिया पोलीस स्टेशन परिसरात एका स्पा सेंटरवर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकून घटनास्थळावरून ७ मुली आणि १३ मुलांना ताब्यात घेतले. या केंद्रात अनेक महिन्यांपासून अनैतिक काम सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांना घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांसह आक्षेपार्ह साहित्यही सापडले आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

याआधीही शहरातील स्पा सेंटरवर कारवाई करण्यात आली असली तरी अनैतिक कामाची प्रकरणे समोर येत आहेत. हे प्रकरण पलासिया पोलीस स्टेशन हद्दीतील गीता भवनजवळचे आहे. येथील श्री बालाजी हाईट्सच्या चौथ्या मजल्यावर छापा टाकून पोलिसांनी ७ मुली आणि १३ तरुणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

बॉक्समध्ये ठेवलेल्या ४२ लाखांच्या नोटा भिजल्या, बँकेचा मोठा निष्काळजीपणा उघड
घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात दारूसह आक्षेपार्ह साहित्य सापडल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. स्पाच्‍या नावाखाली येथे अनेक दिवसांपासून अनैतिक काम केले जात होते. हे काम बराच काळ सुरू असल्याचे टीआय संजयसिंह बैस यांनी सांगितले. याबाबत माहिती मिळताच पोलीस पथकाने छापा टाकून २० आरोपींना अटक केली आहे. बहुतांश मुली इंदोर आणि आसपासच्या भागातील असून त्या ऑपरेटरच्या कॉलवर येत होत्या. सध्या पोलीस सर्वांवर कडक कलमांतर्गत कारवाई करत आहेत.

आग्यामोहोळ की तरह खवळ जाते हैं… अरे पक्या; अजित पवारांनी उडवली आमदार गायकवाडांची खिल्ली

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here