अमरावती : ‘वेदांत फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे १८ सप्टेंबर पासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी मनसेचे नेते संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी अमरावतीत आले असता त्यांनी महाराष्ट्रातील मोठा प्रोजेक्ट वेदांत हा गुजरातला पळवल्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आक्रमक झाली आहे. राज्यभरामध्ये आंदोलन केली जात आहे. यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अमरावतीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवर टिका केली.

महाराष्ट्रातील मोठा प्रोजेक्ट वेदांत हा गुजरातला पळवल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आक्रमक झाली आहे. राज्यभरामध्ये आंदोलन केली जात आहे. यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अमरावतीत माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवर टीका केली आहे.

अदानींच्या पॉकेटमध्ये रॉकेटपेक्षा सुसाट वाढ, बेझॉसला मागे टाकत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत
राष्ट्रवादी, काँग्रेस, आणि शिवसेना हे नाटक करत आहेत. यात राजकारण केलं जात आहे. आंदोलन करून प्रकल्प परत येणार नाही नेमका गुजरातला प्रकल्प का गेला याची सखोल चौकशी केली पाहिजे यामध्ये राजकारण न करता सर्वांनी सोबत येऊन एकत्र लढा दिला पाहिजे. या पुढचे प्रकल्प कसे महाराष्ट्रात राहील याचा विचार केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली.

राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यात मनसैनिकाची संवाद साधणार आहे येणाऱ्या महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीसाठी मनसे सध्या स्वबळावर निवडणूक लढणार आहे. सर्व जागेवर ताकदीनिशी कसा लढा देता येईल, याचा अभ्यास चालू आहे. तूर्तास भाजपसोबत युती करण्याची आमची मानसिकता नाही, असं स्पष्ट मत संदीप देशपांडे आणि यावेळी व्यक्त केलं.

आग्यामोहोळ की तरह खवळ जाते हैं… अरे पक्या; अजित पवारांनी उडवली आमदार गायकवाडांची खिल्ली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here