मुंबई: मित्राची हत्या करण्यासाठी एका तरुणानं पुण्यातील व्यावसायिकाची कार विकली. कारच्या बदल्यात त्यानं गावठी कट्टा खरेदी केला. मात्र मित्राची हत्या करण्यात त्याला अपयश आलं. पोलीस चौकशीत त्यानं संपूर्ण घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. आरोपीची बहिण त्याच्याच मित्रासोबत पळून गेली होती. बहिणीच्या नवऱ्याला संपवण्यासाठी आरोपीनं कट रचला होता. मात्र सैराटची पुनरावृत्ती थोडक्यात टळली.

पुण्यातील व्यावसायिक २२ ऑगस्टला मुंबईत आला होता. व्यावसायिक नरिमन पॉईंट येथील आमदार निवासात गेला. त्यावेळी त्याच्या चालकानं कार बाहेर उभी केली. व्यावसायिक आमदार निवासातून बाहेर आला. त्यावेळी तिथे कार नव्हती. त्यानं चालकाला फोन केला. तो स्विच्ड ऑफ होता. काही तास गेल्यानंतर च्यानं मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आयपीसीच्या कलम ४०८ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
व्हिडीओ कॉलवर महिलेनं काढले कपडे; मुंबईतील आजोबांना लावला २ लाखांचा चुना; काय घडलं?
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर आणि पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी सीसीटीव्ही तपासले. त्यांना कार पुणे टोल नाका ओलांडताना दिसली. टोल भरण्यासाठी चालकानं फास्टॅगचा वापर केला नव्हता. व्यावसायिकाला मेसेज जाईल म्हणून त्यानं रोकड देऊन टोल भरला. चालकानं पळवलेली कार सातारा पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्याच्या अंतर्गत ताब्यात घेतल्याचं तपास अधिकारी राकेश शिंदे यांना समजलं. त्यांनी या प्रकरणाचा अधिक तपशील मागवला. कार चालकासह आणखी एकाला शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात आल्याची माहिती शिंदे यांना मिळाली.

कार चोरीचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस पाटणला पोहोचले. त्यांनी आरोपीला अटक केली. मात्र आरोपी चालकाला जामीन मिळाला आणि त्यानंतर तो गायब झाला. त्याच्यासोबत अटक करण्यात आलेला आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहे. गायब झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांचा पथक पाटणमध्ये तळ ठोकून होतं.
VIDEO: मला धरून ठेवा! मोबाईल चोराची विनवणी; प्रवाशांनी धावत्या ट्रेनबाहेर लटकवलं अन् मग…
चालकाला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला मुंबईत आणलं. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मित्राची हत्या करण्यासाठी हत्यार खरेदी करायचं होतं. गावठी पिस्तुलाच्या एकाला कार विकल्याचं आरोपीनं पोलिसांना सांगितलं. आरोपीच्या मित्रानं आपल्या बहिणीशी पळून जाऊन विवाह केल्याचा राग त्याच्या मनात होता. मित्रानं आपला विश्वासघात केला. त्याला कायमची अद्दल घडवण्यासाठी आरोपी चालकानं संपूर्ण कट रचला. गावठी पिस्तुल घेऊन त्यानं मित्राचा स्टॉल गाठला. मात्र मित्राची प्रकृती ठीक नसल्यानं तो स्टॉलवर येत नव्हता. त्यामुळे तो वाचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here