Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 16, 2022, 5:00 PM
vedanta foxconn project | पुणे जिल्ह्याचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. अडीच लाख कोटी रुपये निधी आपल्या जिल्ह्यात, महाराष्ट्रात येणार होता. दीड लाख मुलांना नोकऱ्या मिळणार होत्या. एवढी मोठी कंपनी दुसऱ्या राज्यात घालवली. आता ज्या नोकऱ्या गेल्या त्या कुणाच्या गेल्यात. आपल्याच मुलामुलींच्या नोकऱ्या गेल्या. या नोकऱ्या दुसऱ्या राज्यात घालवायचं काम या सरकारने केले, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली

हायलाइट्स:
- गरीब कष्ट करणाऱ्या मुलांचा तोंडचा घास काढून घ्यायचं पाप एकनाथ शिंदे यांनी केले
- काही दिवसांनी कलेक्टर माझा फोनच घेणार नाही
- बोलायचं कुणाला? जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा पालकमंत्र्यांकडे जात होतो
अडीच महिने झाले पुण्याला पालकमंत्री नाही. पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास डी पी डी सी चे ८०० कोटी रुपयांची गोरगरीब जनतेच्या विकास कामांची पैसे थांबविले आहेत.हे कशासाठी तर हे फक्त मला करायचे यासाठी. हे सर्व पैसे राज्यातल्या गरीब जनतेचे आहेत. राज्यातील इतर सर्व कामंही अशाचप्रकारे थांबली आहेत.
मला तर वाटते काही दिवसांनी कलेक्टर माझा फोनच घेणार नाही . दररोज त्याला पाच फोन करते. बोलायचं कुणाला? जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा पालकमंत्र्यांकडे जात होतो. मी आणि अजितदादा टीका करून एक आठवडा झाला तरी अजून काय पालकमंत्री नाही. मला आश्चर्य वाटतंय पालकमंत्री नाहीत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
काल तर पुणे जिल्ह्याचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. अडीच लाख कोटी रुपये निधी आपल्या जिल्ह्यात, महाराष्ट्रात येणार होता. दीड लाख मुलांना नोकऱ्या मिळणार होत्या. एवढी मोठी कंपनी दुसऱ्या राज्यात घालवली. आता ज्या नोकऱ्या गेल्या त्या कुणाच्या गेल्यात. आपल्याच मुलामुलींच्या नोकऱ्या गेल्या. या नोकऱ्या दुसऱ्या राज्यात घालवायचं काम या सरकारने केले, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
शरद पवार साहेब बोलले ते बरोबर आहे, महाराष्ट्राची लहान मुलाप्रमाणे समजूत काढण्याचे काम सुरु आहे. ही बाब दुर्दैवी आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाऐवजी राज्यात दुसरा मोठा प्रकल्प आणण्याचे आमिष म्हणजे रडणाऱ्या मुलाची समजूत काढण्यासारखे आहे.वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प हा महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने पुणे जिल्ह्यातील युवकांच्या रोजगारावर मोठा परिणाम होणार आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.