Lumpy Disease Maharashtra | लम्पी आजाराचा प्रभाव आणखी वाढू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवून लम्पीची लागण झालेल्या जनावरांना आयसोलेट केले जाईल. त्यासंदर्भातील सूचना विभागीय आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच राज्यात लम्पी आजाराचा सामना करण्यासाठी लशींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हायलाइट्स:
- देशभरात ७० हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे
- महाराष्ट्रातील काही भागांमध्ये लम्पीचा प्रसार वेगाने
- बाधित जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर्स उभारण्याची घोषणा
एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, लम्पी आजाराचा प्रभाव आणखी वाढू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवून लम्पीची लागण झालेल्या जनावरांना आयसोलेट केले जाईल. त्यासंदर्भातील सूचना विभागीय आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच राज्यात लम्पी आजाराचा सामना करण्यासाठी लशींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, लम्पी स्कीन संदर्भात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. जनावरांमध्ये रोगाची वाढती संख्या पाहाता आणि पुढील धोका ओळखून शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लम्पी आजारामुळे मृत पावलेल्या जनावरांचा मोबदला त्या शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. लम्पी रोग राज्यातील जवळपास २२ जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. ज्या ठिकाणी लम्पी रोगाची लागण झालेली आहे त्या ठिकाणाहून पाच किमीच्या परिघात सर्व जनावरांचं लसीकरण केले जाईल.
लम्पी आजारामुळे गायीचं दूध सुरक्षित आहे का?
लम्पी रोग पशुंकडून माणसांपर्यंत पोहोचत नाही. पशुंकडून तो माणसांना होत नाही, अशी माहिती आयव्हीआरआयचे संयुक्त संचालक अशोक कुमार मोहंती यांनी दिली. लम्पी बाधित गायींचं दूध पिता येऊ शकतं. दूध व्यवस्थित उकळून घ्यावं. लम्पीमुळे दुधाच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम होत नाही, असं मोहंती म्हणाले. लम्पीमुळे स्थानिक स्तरावरील दूध उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. लम्पीचं गांभीर्य पशुच्या रोगप्रतिकारशक्तीवर अवलंबून असतं. लम्पीची लागण झाल्यानंतर जनावरं अशक्त होतात. ताप आणि अन्य लक्षणांचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. लम्पीचा परिणाम दूध उत्पादनावर होऊ शकतो, असे मोहंती यांनी सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.