अमेरिकेत नोकरी करत असलेल्या ५८ वर्षाच्या फांग लु नावाच्या व्यक्तीला प्रमोशन मिळालं नाही. त्यामुळे तो खुनी बनला. फांग लु मूळचा चीनचा आहे. तो ऑईलफील्ड सर्व्हिसेस कंपनी Schlumberger मध्ये काम करत होता. फांगनं त्याच्या बॉसला कुटुंबासह संपवलं.

चीनमधून अमेरिकेला नुकत्याच पोहोचलेल्या फांगला ८ वर्षांपूर्वी केलेल्या हत्याकांडाप्रकरणी अटक करण्यात आली. पोलीस चौकशीत त्यानं हत्यांमागचं कारण सांगितलं. फांगला न्यायालयात हजर करण्यात आलं. फांग सातत्यानं त्याचा जबाब बदलत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. २०१४ मध्ये आरोपीनं माओये (बॉस), त्यांची पत्नी मेईक्सी, ९ वर्षांची मुलगी आणि ७ वर्षांच्या मुलाची हत्या केली. चौघांचे मृतदेह वेगवेगळ्या बेडरुममध्ये सापडले होते.
फांग लुला प्रमोशन अपेक्षित होतं. मात्र त्यांच्या बॉसनं त्यांना प्रमोशन नाकारलं. त्यामुळे फांग संतापला. त्यानं बॉसच्या संपूर्ण कुटुंबाला संपवलं. फांगला अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोहून अटक करण्यात आली. हत्येनंतर तो मायदेशात पळाला. ८ वर्षांनंतर तो पुन्हा अमेरिकेला पळाला. प्रमोशन देण्याऐवजी बॉसनं अपमान केला. सर्व कर्मचाऱ्यांवर तो वाईटसाईट बोलला. त्यामुळे सर्वांसमोर आपली प्रतिमा मलीन झाली. दुसऱ्या विभागात बदली मागितली. मात्र तीही मिळाली नाही. त्यामुळे बॉसच्या संपूर्ण कुटुंबासह संपवल्याची कबुली फांगनं पोलिसांना दिली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.