मुंबई :  राज्यातील सर्व कारागृहामध्ये (Jail)  जन्म झालेल्या  बालकांच्या  जन्म दाखल्यामध्ये (Birth Certificate) जन्मस्थान कारागृह असे नमुद न करता ज्या शहरात किंवा गावात त्यांचा जन्म झाला आहे  त्या गावाचे नाव नमुद करावे, असे आदेश राज्य सरकारने (Maharashtra Government) दिले आहे.  महाराष्ट्र सरकारने नुकताच एक जीआर जारी करून सर्व तुरुंगांना नियमांचे पालन करण्यास सांगितले होते. याबाबत सर्व कारागृह अधीक्षकांनी काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशे आदेश व परिपत्रक जारी करण्यात आले.

तुरूंगात मुलाचे संगोपन करणे हो कोणत्याही आईसाठी क्लेशदायक आहे. काही प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या महिला कैदी गर्भवती असतात आणि तुरुंगातच मुलाला किंवा मुलीला जन्म देतात. त्यामुळे एका नवजात बालकाला सोनेरी दिवसांचे सुख अनुभवण्याऐवजी त्याच्या आईबरोबर तुरुंगाच्या गजाआड आपल्या आयुष्याची सुरुवात करावी लागते. तुरुंगात सहा वर्षांपर्यंतच्या मुलांना त्यांच्या आईबरोबर राहता येते. त्यानंतर या मुलांची रवानगी बालसुधारगृहात केली जाते.  या मुलांच्या मातांनी केलेल्या गुन्ह्याची झळ भविष्याच मुलांना पोहचू नये, यासाठी सर्व कारागृह अधीक्षकांनी काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशे आदेश व परिपत्रक जारी करण्यात आले.

 तुरुंगात आपले बालपण घालवणाऱ्या या निरागस, निष्पाप बालकांचा काय दोष? गुन्हा त्यांच्या मातेने केला आहे. ही मुले त्यापासून फार लांब असतात, या मुलांच्या मातांनी केलेल्या गुन्ह्याची झळ मुलांना पोहोचू नये, त्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.  कारागृहात वाढणाऱ्या मुलांचे  बालमनावर परिणाम होऊ नये,यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. तसेच  या मुलांना आईवर असलेला आरोप, त्याचे गांभीर्य आणि आसपासचे वातावरण यापैकी कशाचीच जाणीव हे लोक होऊ देत नाहीत. 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here