जोधपूर: राजस्थानच्या जोधपूरमध्ये पोलिसांनी एका नर्सच्या हत्येप्रकरणी तिच्या लिव्ह इन पार्टनरला अटक केली आहे. आरोपीनं पोलिसांसमोर आत्महत्येचा बनाव उभा केला होता. मात्र शवविच्छेदनातून हत्येचा प्रकार उघडकीस आला. गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालातून उघडकीस आलं. पोलिसांनी नर्सचा प्रियकर हरिश माळीला अटक केली असून त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी नर्सच्या वडिलांनी हरिशविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

जोधपूरच्या शास्त्रीनगरात हा प्रकार घडला. ३० वर्षांच्या सारिकाची हरिशनं हत्या केली. २०१८ मध्ये सारिकाचा विवाह वैभव अग्रवालसोबत झाला. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. दोघे महिन्याभरात वेगळे झाल्यानंतर सारिकानं उमेद रुग्णालयात नर्स म्हणून काम सुरू केलं. त्यावेळी तिची ओळख हरिशशी झाली. हरिश आधी सरिताच्या वडिलांकडे चालक म्हणून काम करायचा. तो ४ महिन्यांपूर्वीच झालावाडहून जोधपूरला राहायला आला होता. सारिका आणि हरिश लिव्ह-इनमध्ये राहू लागले. दरम्यान सारिका गर्भवती राहिली.
प्रमोशन देईना, ऑफिसमध्ये सतत अपमान; कर्मचारी संतापला, बॉसच्या संपूर्ण कुटुंबाला संपवलं
७ सप्टेंबरच्या रात्री सारिका घरी परतली, त्यावेळी हरीश माळी मद्यधुंद अवस्थेत होता. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. हरिशनं सरिताची गळा आवळून हत्या केली. सरितानं गळफास लावून आत्महत्या केल्याचं ८ सप्टेंबरला हरिशनं पोलिसांना सांगितलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले. आपण सरिताचा मृतदेह खाली उतरवल्याचं हरिशनं पोलिसांना सांगितलं.

अटक टाळण्यासाठी हरिशनं आत्महत्येची कहाणी रचली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. सरितानं आत्महत्या केलेली नसून गळा दाबून तिची हत्या करण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं. पोलिसांनी याची माहिती सरिताच्या वडिलांना दिली. त्यांनी हरिशविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी हरिशला अटक केली.
सैराटची पुनरावृत्ती टळली! बहिणीच्या पतीला मारण्यासाठी मालकाची कार विकली, बंदूक घेतली, पण…
सरिता गर्भवती होती, अशी माहिती हरिशनं चौकशीदरम्यान पोलिसांना दिली. गर्भवती राहिल्यापासून सरिता फार चिडचिड करायची. त्यामुळे दोघांमध्ये अनेकदा भांडणं व्हायची. ८ सप्टेंबरला सरिता ड्युटीवरून घरी परतली. त्यावेळी हरिश दारू पित होता, सिगारेटही ओढत होता. ते पाहून सरिता संतापली. दोघांमध्ये भांडण झालं आणि दारूच्या नशेत हरिशनं सरिताला गळा दाबून संपवलं. सरिताची हत्या लपवण्यासाठी त्यानं आत्महत्येचा बनाव रचला. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here