ood & Drug Administration Maharashtra | उत्पादन पद्धतीमध्ये दोष असल्यामुळे या उत्पादनाचा सामू (PH) हा प्रमाणित मानकानुसार नाही. त्याच्या वापराने नवजात शिशु व लहान मुलांच्या त्वचेस अपाय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपरोक्त उत्पादन सुरू ठेवणे हे व्यापक जनहिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही. त्यामुळे कंपनीच्या मुलुंड उत्पादन कारखान्याचा “जॅान्सन बेबी पावडर” या उत्पादनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त गौरीशंकर बायले यांनी दिली.

हायलाइट्स:
- शिशूंच्या त्वचेसाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांसाठीच्या निकषांमध्ये बसत नसल्याचे सिद्ध
- या पावडरच्या निर्मितीवर निर्बंध लादण्यात आले आहेत
गेल्या अनेक वर्षांपासून जॉन्सन अँण्ड जॉन्सन कंपनी भारतात आपल्या उत्पादनांची विक्री करत आहे. लहान बाळांसाठी वापरण्यात येणारी या कंपनीची उत्पादने भारतीय बाजारपेठेत प्रचंड लोकप्रिय होती. मात्र, उत्पादन पद्धतीमध्ये दोष असल्यामुळे या उत्पादनाचा सामू (PH) हा प्रमाणित मानकानुसार नाही. त्याच्या वापराने नवजात शिशु व लहान मुलांच्या त्वचेस अपाय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपरोक्त उत्पादन सुरू ठेवणे हे व्यापक जनहिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही. त्यामुळे कंपनीच्या मुलुंड उत्पादन कारखान्याचा “जॅान्सन बेबी पावडर” या उत्पादनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त गौरीशंकर बायले यांनी दिली.
नेमकं प्रकरण काय?
‘जॉन्सन्स बेबी टाल्कम पावडर’ या लोकप्रिय बालप्रसाधन उत्पादनात प्रमाणाबाहेर आलेले जीवाणू कमी करण्यासाठी कॅन्सरप्रवण अशी निर्जंतुकीकरण प्रक्रिया केल्याच्या आरोपावरून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या सर्व प्रसाधनांचा उत्पादन परवाना रद्द केला होता. कंपनीला अपीलासाठी राज्य सरकारचे दरवाजे ठोठावण्याची मुभा देण्यात आली होती. सन २००७मध्ये ‘जॉन्सन’ला आपल्या बेबी पावडरमध्ये जीवाणूंचे प्रमाण विहित निकषांपेक्षा जास्त असल्याचे लक्षात आले. हे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांनी एथिलिन ऑक्साइडचा वापर करून निर्जंतुकीकरण प्रक्रिया केली. मात्र निर्जंतुकीकरण केल्यानंतर एथिलिन ऑक्साइडचे प्रमाण त्यात किती राहिले, त्याचा नवजात शिशूंच्या त्वचेवर परिणाम होईल का, हे शोधण्याची चाचणी त्यांनी केली नाही. ही प्रक्रिया कॅन्सरप्रवण असू शकते, असे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे म्हणणे होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.