पुढील वर्षी जगभरात मंदी येऊ शकते असे जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे. जागतिक बँकेने आपल्या नवीन अहवालात म्हटले की, जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून आर्थिक धोरण कडक केल्यामुळे महागाई नियंत्रित करण्यासाठी उत्पादन वाढवणे आणि पुरवठ्यातील अडथळे दूर करणे आवश्यक आहे. याशिवाय जागतिक मंदीची काही चिन्हे आधीच प्राप्त होत असल्याचंही बँकेने अहवालात म्हटले आहे. त्यात तसेच जागतिक अर्थव्यवस्था आता १९७० च्या मंदीनंतर सर्वात मोठ्या घसरणीला पोहोचली असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अमेरिकेनंतर भारतात लगेचच व्याज दरवाढ का? जाणून घ्या महागाई, रेपो दर, रोखे आणि रुपया यांच्यातील कनेक्शन
वाढते व्याजदर चिंतेचे कारण
मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात वाढ ४ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते, जी २०२१ च्या तुलनेत दुप्पट आहे. त्यामुळे महागाई नियंत्रणात राहील. अन्न आणि तेलाची महागाई ५ टक्के ठेवण्याचे लक्ष्य असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे.

रेपो दर वाढवणं RBI लाच पडेल महागात, अर्थव्यवस्थेवर कोणत्या गंभीर परिणामांची भीती?
अमेरिकेपासून युरोप आणि भारतापर्यंत सर्वच देश आक्रमकपणे व्याजदर वाढवत आहेत. स्वस्त पैशाचा पुरवठा नियंत्रित करून महागाई कमी करण्यास मदत करणे हा त्यामागील हेतू आहे. पण अशा कठोर आर्थिक उपायांची किंमत मोजावी लागते. त्यामुळे गुंतवणुकीवर परिणाम होतो, नोकरी जाण्याची भीती असते. आणि वाढ देखील घसरते. अशा परिस्थितीत भारतासह बहुतांश देशांना या संकटाचा सामना करावा लागू शकतो.

अमेरिकेतील महागाईमुळे भारतीय शेअर बाजारात खळबळ, असे का? एका क्लिकवर समजून घ्या
जागतिक वाढ मंदावली
“जागतिक वाढ झपाट्याने मंदावली आहे, अधिक देश मंदीच्या गर्तेत पडल्यामुळे आणखी मंदावण्याची शक्यता आहे. माझी गंभीर चिंता अशी आहे की हे ट्रेंड कायम राहतील, दीर्घकाळ टिकणारे परिणाम जे उदयोन्मुख बाजारपेठेतील आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमधील लोकांसाठी विनाशकारी आहेत,” जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी गुरुवारी एका निवेदनात सांगितले. सरकारी आकडेवारीनुसार जुलैमध्ये ६.७१ टक्‍क्‍यांच्या वाढीच्या तुलनेत खाद्यपदार्थांच्या उच्च किमतींमुळे ऑगस्टमध्ये भारताची किरकोळ महागाई ७ टक्क्यांनी वाढली आहे.

युक्रेन-रशिया युद्धासह अनेक कारणांमुळे जगाला सध्या विक्रमी महागाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अन्नधान्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. याशिवाय पुरवठा साखळीवरही करोना संसर्गाचा परिणाम झाला आहे. करोना लॉकडाऊनमुळे चीनमध्ये मागणी कमी आहे आणि खराब हवामानामुळे कृषी उत्पादनाच्या अंदाजालाही धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here