मुंबई : तुम्ही आयपीओ (IPO) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गुंतवणूकदारांना गुंतवणूक आणि कमाई करण्याची चांगली संधी आहे. क्रिसकॅपिटल (ChrysCapital) कडून गुंतवणूक असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या फार्मा कंपन्यांपैकी एक मॅनकाइंड फार्मा आपला IPO आणणार आहे. मॅनकाइंड फार्माने शेअर बाजार नियंत्रक सेबीकडे आयपीओसाठी अर्ज दाखल केला आहे. कंपनीचा हा आयपीओ ५५८७ कोटी रुपयांचा असू शकतो. आपला मेगा IPO आणण्यासाठी कंपनीने गुंतवणूक बँकर्सशी आधीच प्रारंभिक चर्चा सुरू केली होती.

Vedanta Ltd च्या शेअर्समध्ये ६ टक्क्यांपेक्षा जास्त घसरली; गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान
दुसरा मोठा IPO
मॅनकाइंड फार्मा या कंपनीत ChrysCapital व्यतिरिक्त कॅपिटल इंटरनॅशनल आणि सिंगापूरच्या GIC चीही गुंतवणूक आहे. कंपनीचा IPO मुख्यत्वे ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत येऊ शकतो. कंपनीने हा IPO आणला तर तो फार्मा क्षेत्रातील दुसरा सर्वात मोठा IPO ठरू शकतो. या क्षेत्रातील सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम ग्लँड फार्माच्या नावावर आहे. Gland Pharma ने नोव्हेंबर २०२० मध्ये ८६९ दशलक्ष डाॅलरचा IPO आणला होता.

गुंतवणुकीसाठी पतंजली मंत्रा; बाजारात ४ IPO आणणार..बाबा रामदेव यांची १ लाख कोटींची योजना!
४ कोटी शेअर्सची विक्री
आयपीओमध्ये कंपनीच्या प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांद्वारे 4 कोटी (४०,०५८,८४४) शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील. रमेश जुनेजा, राजीव जुनेजा, शीतल अरोरा, रमेश जुनेजा फॅमिली ट्रस्ट, राजीव जुनेजा फॅमिली ट्रस्ट आणि प्रेम शीतल फॅमिली ट्रस्ट हे कंपनीचे प्रवर्तक आहेत.

बाजार अस्थिरतेच्या काळात कमाईची संधी, ‘हे’ शेअर्स असतील गुंतवणूकदारांच्या रडारवर…
कंपनीचा व्यवसाय
मॅनकाइंड फार्माची स्थापना १९९१ मध्ये झाली. ही भारतातील अग्रगण्य औषध कंपन्यांपैकी एक आहे. ब्रँडेड जेनेरिक औषधांव्यतिरिक्त कंपनीच्या आघाडीच्या ब्रँडमध्ये प्रीगा-न्यूज प्रेग्नन्सी टेस्टिंग किट, मॅनफोर्स कंडोम, गॅस-ओ-फास्ट आयुर्वेदिक अँटासिड आणि मुरुमांवर उपचार करणारे औषध Acnestar यांचा समावेश आहे. कंपनीकडे ३१ मार्च २०२२ पर्यंत हिमाचल प्रदेश, सिक्कीम, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांसह संपूर्ण भारतात २३ उत्पादन सुविधा आहेत. भारतानंतर अमेरिका, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ ही प्रमुख बाजारपेठ आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here