मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडून नुकतीच पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह सुनील तटकरे यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कारवाईमुळे अटकेत असलेले नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना मात्र कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे अटकेनंतर मलिक यांचं राजकीय वजन घटल्याची चिन्हे दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नुकतंच नवी दिल्ली येथे पार पडलं. या अधिवेशनात अनेक ठराव मंजूर करण्यात आले. तसंच शरद पवार यांची पुन्हा एकदा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या अधिवेशनानंतर पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक पत्रक काढत राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. मात्र यामध्ये मलिक यांना स्थान देण्यात आलेलं नाही.

Manikrao Gavit : सलग नऊ वेळा खासदार, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत कोणाला स्थान?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आलं आहे. पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांमध्ये डॉ. योगानंद शास्त्री, के. के. शर्मा, पी. पी. महंमद फैजल यांची, तर राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून वाय. पी. त्रिवेदी यांची नियुक्ती करण्यात आली. कायम सचिव म्हणून एस. आर. कोहली काम पाहणार आहेत. ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकारी समितीत २८ जण असून, यात शरद पवार, प्रफुल पटेल, टी. पी. पीतांबरम मास्टर, सुनील तटकरे, के. के. शर्मा, एस. आर. कोहली, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, अजित पवार, फौजिया खान, ए. के. ससिंद्रन, पी. सी. चाको, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, वाय. पी. त्रिवेदी, वंदना चव्हाण, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, धीरज शर्मा, सोनिया दोहन, थॉमस के. थॉमस, दिलीप वळसे-पाटील, सलेंग संगमा, रामराजे नाईक निंबाळकर, मधुकर कुकडे आणि शिवाजीराव गर्जे यांचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येक राज्याचे प्रदेशाध्यक्ष सदस्य म्हणून असतील.

आजोबांचे विचार वाचा म्हणणाऱ्यांना राज ठाकरेंचं प्रबोधनकारांच्या जयंती दिनी सणसणीत प्रत्युत्तर

राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून कोणाकडे जबाबदारी?

राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून मुंबईतील क्लाइड कॅस्ट्रो यांची नियुक्ती झाली. त्यांच्याकडे गोव्याचे निरीक्षक आणि समन्वयकाची जबाबदारीही देण्यात आली आहे. शब्बीर विद्रोही छत्तीसगडचे निरीक्षक व समन्वयक, मधुकर कुकडे यांच्याकडे मध्य प्रदेशची, धीरज शर्मा यांच्याकडे दिल्ली, तर सोनिया दहोन यांच्याकडे हरियाणाची जबाबदारी देण्यात आली आहे. नरेंद्र वर्मा यांना मीडिया प्रभारी व राष्ट्रीय प्रवक्ते नेमण्यात आले आहे, अशी माहिती पटेल यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here