नांदेड : वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यभरात मोठा गदारोळ झाला. हा प्रकल्प राज्याच्या हातातून निसटल्याने लाखो तरुणांची नोकरीची संधी हिरावली गेल्याने सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. अशातच आज भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस भरतीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या तरुणांच्या घोषणाबाजीचा सामना करावा लागला आहे.
‘गेल्या काही वर्षांपासून पोलीस भरतीची प्रक्रिया केली जात नाही. परिणामी तरुणांसमोर रोजगाराचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ ही भरती करावी,’ अशी मागणी आंदोलनकर्त्या तरुणांनी केली आहे.
दरम्यान, तरुणांच्या आक्रमक आंदोलनानंतर राज्य सरकार पोलीस भरतीबाबत काय निर्णय घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.