यवतमाळ : यवतमाळ-अमरावती रस्त्यावर खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढलं आहे. या मार्गाने प्रवास करणं म्हणजे मृत्यूच्या सापळ्यात अडकण्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे सदर मार्गावरील ३४ शाळांमधील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर अपघातात पुढचा नंबर आमचा तर नाही ना? अशी भीती व्यक्त करत विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. यवतमाळ-अमरावती जिल्ह्यातील ८ हजार विद्यार्थ्यांनी थेट गडकरी यांना पत्र लिहून दुरवस्थेकडे लक्ष वेधलं आहे.

तीन राज्यांना जोडणाऱ्या यवतमाळ-अमरावती मार्गावरील ३४ शाळेतील विद्यार्थ्यांनी ८ हजार विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींना पत्राद्वारे भावनिक साद घातली आहे. उत्तर व दक्षिण कॉरीडोर जोडण्याच्या हेतूने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या राज्य सीमेवरील अमरावती जिल्ह्यातील धामणी तालुक्यातील भोकरबर्डी या गावापासून हरिसाल, सिमाडोह, परतवाडा, अमरावती, बडनेरा, नांदगाव खंडेश्वर, नेर , यवतमाळ, उमरीपासून पांढरकवडा तालुक्यातील करंजीपर्यंत हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित होता. मात्र राजकीय पुढाऱ्यांच्या धोरणामुळे हा मार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही.

रझाकारांवर प्रहार तर आधुनिक ‘सजा’कारांच्या बंदोबस्ताची भाषा, राज ठाकरेंचं औरंगाबादच्या ‘मुक्ति’संग्रामाचं पत्र

या मार्गावर येणाऱ्या ३४ शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे अखेर दोन्ही जिल्ह्यातील तब्बल ८ हजार विद्यार्थ्यांनी थेट मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील सावरकर नगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या पत्त्यावर पत्र पाठवलं आहे. यामधे विद्यार्थ्यांनी खड्डेमय रस्त्यावर दररोज प्रवास करताना होत असलेल्या त्रास आणि भीती बद्दलची व्यथाच मांडली आहे.

पुण्यातील महिला पोलिसाची भरपावसात भन्नाट कामगिरी, व्हिडिओ पाहून तुम्हीही सलाम कराल

दरम्यान, या रस्त्यावर अपघातात अनेक शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. कदाचित पुढला नंबर आमचा तर नाही ना? असा उद्विग्न सवालही विद्यार्थ्यांनी गडकरींना विचारला आहे. यवतमाळ, नेर, नांदगाव, बडनेरा येथील विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला असून यासाठी गणेश राऊत, प्रविण पाटमासे, गौरव नाईकर, रुपेश गुल्हाने, प्रणय बोबडे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here