हैदराबाद: गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. अमित शह तेलंगणातील हैदराबादमध्ये असताना तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) नेत्यानं त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर स्वत:ची कार उभी केली. टीआरएसचे नेते श्रीनिवास यांची कार सुरक्षा रक्षकांनी जबरदस्तीनं ताफ्यासमोरुन हटवली. श्रीनिवास यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आपण चिंतेत होतो. त्यामुळे हा प्रकार घडला आणि आपली कार ताफ्यासमोर थांबवली, असं श्रीनिवास यांनी सांगितलं. गृह मंत्रालयाच्या सुरक्षा पथकानं श्रीनिवास यांची कार हटवली. या पथकानं आपल्यावर दबाव टाकल्याचा आणि कारची तोडफोड केल्याचा आरोप त्यांनी केला. माझी कार ज्या पद्धतीनं रोखण्यात आली, त्यामुळे मला चिंता वाटली. पोलीस अधिकाऱ्यांकडे मी याची तक्रार करेन. जाणूनबुजून माझ्या कारची मोडतोड करण्यात आली. हा तणाव नाहक निर्माण करण्यात आला होता, असा गंभीर आरोप श्रीनिवास यांनी केला.
मोदींकडे ना घर, ना गाडी, फक्त इतकी कॅश, वाचा पंतप्रधानांच्या संपत्तीचा उतारा
हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त कार्यक्रमासाठी अमित शहा हैदराबादमध्ये आहेत. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली. श्रीनिवास यांनी शहा यांच्या ताफ्यासमोर कार उभी केली. यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांची कार हटवली. आपण तणावाखाली असल्यानं हा प्रकार घडल्याचा दावा त्यांनी केला. जाणुनबुजून हा तणाव निर्माण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

काय म्हणाले अमित शाह?
हैदराबाद मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात अमित शहांनी सहभाग घेतला. हैदराबाद मुक्ती संग्रामाचं श्रेय त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना दिलं. मतपेढीच्या राजकारणामुळे मुक्ती दिन साजरा करण्याचं आश्वासन विसरलेल्यांवर त्यांनी निशाणा साधला. सरदार पटेल नसते, तर हैदराबाद मुक्त होण्यास आणखी अनेक वर्षे लागली असती. जोपर्यंत निझामाचे रझाकार पराभूत होत नाहीत, तोपर्यंत अखंड भारताचं स्वप्न साकारणार नाही, याची पटेल यांना कल्पना होती, असं शहा म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here