उस्मानाबाद : उस्मानाबाद पोलिसांनी शहरातील दोन हॉटेलवर मोठी कारवाई करत देह विक्रयाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ५ मुलींची सुटका केली असून या प्रकरणात हे रॅकेट चालवणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले आहे. यांपैकी २ आरोपी हे परराज्यातील आहेत. उस्मानाबाद शहरातील सरिता हॉटेल आणि बावर्ची हॉटेल या दोन हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची गुप्त माहिती उस्मानाबाद पोलीसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Police busted prostitution business in Osmanabad and rescued 5 girls)

हॉटेल सरिता आणि हॉटेल बावर्ची या दोन हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीसांनी बनावट ग्राहक एजंटाकडे पाठवले. या एजंटांनी बनावट ग्राहकांना मुलींचे फोटो दाखवले आणि त्यांचे दर सांगितले. या नंतर सरिता हॉटेल आणि बावर्ची हॉटेल येथे काल रात्री पोलीसांनी छापा टाकला. या कारवाईत सरिता हॉटेल येथे ४ मुली सापडल्या, तर बावर्ची हॉटेलमध्ये १ मुलगी सापडली. या दोन्ही छाप्यात ५ मुली सापडल्या. यातील रॅकेट चालवणारे २ आरोपी हे परराज्यातील आहेत. या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत आज दिली.

खबरीने दिली गुप्त माहिती; पोलिसांच्या नजरेची कमाल, पकडला लाखोंचा नजर
या प्रकरणातील आरोपींनी ही दोन हॉटेल भाडयाने घेतलेली होती. तेथे परराज्यातील मुली वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणल्या होत्या. यातील एक महिला ही उस्मानाबाद जिल्हयातील आहे. येथे येणाऱ्या ग्राहकांना प्रथम मुलींचे फोटो दाखवले जात असत. त्यानंतर त्यांचा दर निश्चित झाल्यानंतर ग्राहकांना निवड करण्यात आलेल्या मुलीकडे पाठवले जात असे.

Osmanabad News : महिला भक्तांसोबत विनयभंग, लोमटे महाराजाला दीड महिन्यांनी अटक; वाचा संपूर्ण प्रकरण
या कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींविरोधात पोलिसांनी कलम ३७० मानवी अनैतिक प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई कळंब येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक एम. रमेश असे करावे यांनी केली आहे. या प्रकरणाचा तपास उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक उस्मान शेख हे करत आहेत.

दोन्ही आरोपी विरोधात पोलीसांनी कलम ३७० मानवी अनैतिक प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केलाय ही कारवाई कळंब येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी केली आहे. या प्रकरणाचा तपास उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक उस्मान शेख हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here