एका ट्रेनचे डबे अचानक वेगळे झाले. ट्रेन दोन भागांत विभागली आणि काही डबे वेगळ्याच शहराच्या दिशेनं जाऊ लागले. कॅनडातून लंडनला गेलेला एक जण या ट्रेनमधून प्रवास करत होता. त्याचवेळी ट्रेन दोन भागात विभागली गेली. त्यामुळे तो भलत्याच दिशेनं जाऊ लागला. हा प्रकार पाहून प्रवासी हैराण झाला.

 

train split
प्रवासी, कृपया इकडे लक्ष द्या! ही घोषणा ऐकताच रेल्वे प्रवासी कान टवकारतात. अनेकदा ही घोषणा ऐकताच आज ट्रेन उशिरानं धावत असणार हाच विचार प्रवाशांच्या मनात येतो. मात्र ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये एक वेगळीच घटना घडली. त्यामुळे ट्रेनमधील प्रवासी भयभीत झाले.

एका ट्रेनचे डबे अचानक वेगळे झाले. ट्रेन दोन भागांत विभागली आणि काही डबे वेगळ्याच शहराच्या दिशेनं जाऊ लागले. कॅनडातून लंडनला गेलेला एक जण या ट्रेनमधून प्रवास करत होता. त्याचवेळी ट्रेन दोन भागात विभागली गेली. त्यामुळे तो भलत्याच दिशेनं जाऊ लागला. हा प्रकार पाहून प्रवासी हैराण झाला.
प्रमोशन देईना, ऑफिसमध्ये सतत अपमान; कर्मचारी संतापला, बॉसच्या संपूर्ण कुटुंबाला संपवलं
कॅनेडियन प्रवाशानं त्याला आलेला अनुभव टिकटॉकवर शेअर केला आहे. ‘पहिल्यांदाच ब्रिटनमध्ये ट्रेननं प्रवास करतोय. रस्त्यात माझ्या ट्रेनची दोन भागांमध्ये विभागणी झालीय. माझ्या मोबाईलमध्ये केवळ ३ टक्के बॅटरी शिल्लक राहिलीय आणि खिशात फक्त २ पाऊंड्स आहेत. मी कोणत्यातरी भलत्याच शहराकडे जाऊ लागलोय. कृपया माझी मदत करा,’ असं आवाहन प्रवाशानं व्हिडीओच्या माध्यमातून केलं.
सैराटची पुनरावृत्ती टळली! बहिणीच्या पतीला मारण्यासाठी मालकाची कार विकली, बंदूक घेतली, पण…
ट्रेन वेगळ्याच दिशेनं जाऊ लागताच प्रवासी चिंतेत पडला. ट्रेन अचानक २ भागांत विभागल्यानं प्रवाशाला काय करावं ते कळेना. त्याच्या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. थोड्याच वेळात प्रवाशानं एका प्रतिक्रियेला उत्तर दिलं. आपण हव्या असलेल्या स्थानकात पोहोचल्याचं प्रवाशानं उत्तरात नमूद केलं होतं.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here