जिल्हा परिषद शाळा विहिरगाव येथे कार्यरत असलेले रामचंद्र उराडे (वय ५६) या शिक्षकाने काल सकाळच्या सुमारास वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. आज ठाकरी इल्लूर येथे त्यांचा मृतदेह आढळून आला.

गोंडपिपरीतील शिवाजी चौकात वास्तव्यास असणारे रामचंद्र उराडे काल सकाळपासून बेपत्ता होते. कुटुंबियानी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली होती. दरम्यान पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असता, ठाकरी इल्लूर येथील नदीपात्रालगत उराडे यांचा मृतदेह आढळून आला. रामचंद्र उराडे हे गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाने त्रस्त होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.