पंजाब : एका विद्यापीठात रात्री उशिरा असा काही प्रकार घडला की यामुळे एकच खळबळ उडाली आहे. इथे एका विद्यार्थ्यीनीनेच इतर विद्यार्थिनी आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर व्हायरल केला. हे व्हिडिओ समोर आल्यानंतर वसतिगृहातील ८ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या गेट क्रमांक २ वर विद्यार्थ्यांनी हा गोंधळ घातला. याठिकाणी अनेक विद्यार्थी जमले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस आल्यानंतर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थी शांत झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनींपैकी एका विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणीला अटक केली आहे.

सीमेवर एकाच खड्ड्यात सापडली ८ पोती, उघडताच BSF जवान हादरले
ही घटना पंजाबमधील मोहाली येथील चंदिगड विद्यापीठातील आहे. दुपारी अडीचच्या सुमारास अनेक विद्यार्थ्यांनी इथे पोहोचून निदर्शने केली. मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने आंघोळ करताना ६० विद्यार्थिनींचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थी हे व्हिडिओ एका मुलाला पाठवत असे. तो मुलगा ते व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करायचा.

‘आम्हाला न्याय हवा’ विद्यार्थ्यांच्या घोषणा

हा प्रकार उघड होताच विद्यार्थ्यांनी विद्यापीठासमोर चांगलाच गोंधळ घातला. विद्यार्थ्यांनी ‘वुई वॉन्ट जस्टिस’च्या घोषणा देत विद्यापीठाच्या गेटवर निदर्शने केली. आरोपी विद्यार्थीनीची ओळख पटली आहे. वसतिगृहात विद्यापीठ प्रशासनाने इतर विद्यार्थिनींसमोर तीची चौकशी केली. विद्यार्थिनीने विद्यापीठ प्रशासनाच्या चौकशीत सांगितले की, ती बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवत होती. ज्या मुलाला ती हे व्हिडिओ पाठवत होती तो शिमलाचा रहिवासी आहे.

खोलीत तरुण-तरुणी, मोबाईलमध्ये सापडले धक्कादायक फोटो; मसाज पार्लरमध्ये जाताच पोलिसही हादरले
आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला

जेव्हा मुलींनी ते व्हिडिओ इंटरनेटवर पाहिले तेव्हा संपूर्ण प्रकरण समोर आले. या घटनेमुळे वसतिगृहात राहणाऱ्या ८ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वरित विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अमित शहांच्या सुरक्षेत मोठी चूक; ताफ्यासमोर टीआरएस नेत्यानं कार आडवी लावली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here