Authored by निलेश झाडे | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 18, 2022, 3:28 PM

Chandrapur news : चंद्रूपूर शहरातील सोमय्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बारावीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने कॉलेजच्या इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

 

Chandrapur news
कॉलेजच्या इमारतीवरुन विद्यार्थीनीची उडी, शिवसैनिकांची प्राचार्यांना मारहाण

हायलाइट्स:

  • कॉलेजच्या इमारतीवरुन उडी घेत विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न
  • शिवसैनिकांनी या प्रकरणी कॉलेजच्या प्राचार्यांना मारहाण केली
  • चंद्रपूरमधील सोमय्या कॉलेजमधील घटना
चंद्रपूर : कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरातील सोमय्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये घडला आहे. बारावीचे शिक्षण घेणारी ही विद्यार्थिनी नीट परीक्षेची तयारी करीत होती. प्रकरण दडपणाऱ्या संस्थेविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसैनिकांनी चक्क महाविद्यालयातील प्राचार्यांना मारहाण केली असल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.

शहरातील नामवंत शिक्षण संस्था असलेल्या सोमय्या कॉलेजच्या इमारतीवरून विद्यार्थिनीने उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. शनिवारी दुपारी सोमय्या कॉलेज व पॉलिटेक्निक येथील बारावीत शिकणारी विद्यार्थिनी निट परीक्षेची तयारी करत होती. तिने महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली.

Team India: भारतीय क्रिकेट चाहत्यांना धक्का, आणखी एक फास्ट बॉलर जखमी…
जखमी अवस्थेत असलेल्या विद्यार्थिनीला शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने या विद्यार्थिनीला नागपूर उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान, नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर संबंधित प्रकाराची माहिती शिवसैनिकांना देखील मिळताच शिवसैनिक सोमय्या कॉलेजमध्ये दाखल झाले. या संपूर्ण घटनेला कॉलेजच्या प्राचार्यांना जबाबदार ठरवून आणि कॉलेज हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत शिवसैनिकांनी मारहाण केली.

नाशकात भरदिवसा नारळाच्या झाडावर २ बिबटे चढले, व्हिडीओ व्हायरल

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here