भारत जैन महामंडळ यांच्या वतीने आयोजित विश्व मैत्री दिवसाच्या क्षमापना समारोहाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून जैन साधू आणि साध्वींना अभिवादन करून त्यांचे आशिर्वाद घेतले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. याच कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी मैत्री दिवसाच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंना झालं गेलं विसरुन जा, असं अप्रत्यक्षपणे सांगत एकत्र येण्याची साद घातली.

हायलाइट्स:
- विश्व मैत्री दिवसाच्या क्षमापना समारोहाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थिती
- भाषणात तुफान टोलेबाजी करत उद्धव ठाकरेंना एकत्र येण्यासाठी टाळी मागितली
भारत जैन महामंडळ यांच्या वतीने आयोजित विश्व मैत्री दिवसाच्या क्षमापना समारोहाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून जैन साधू आणि साध्वींना अभिवादन करून त्यांचे आशिर्वाद घेतले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. याच कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी मैत्री दिवसाच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंना झालं गेलं विसरुन जा, असं अप्रत्यक्षपणे सांगत एकत्र येण्याची साद घातली. मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात पण क्षमा करण्यासाठी मोठं काळीज लागतं, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी मैत्रीचा चेंडू ठाकरेंच्या कोर्टात ढकलला. उद्धव ठाकरेंनी ‘पुनश्च हरिओम’ म्हणत मागील अडीच महिन्यांमधल्या घटना विसरुन ‘आवाज’ द्यावा, अशी अपेक्षाच एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्ष बोलून दाखवली.
राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांचं तोंडभरुन कौतुक
याच कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंडभरुन कौतुक केलं. सरकार स्थापन होऊन अगदी दोन-अडीच महिन्यांचा कार्यकाळ उलटलाय. पण या दोन महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या कामाने जनतेला आपलंसं केलं आहे. मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. मुख्यमंत्री छा जा रहैं है, बादल भी छाँ जा रहे हैं, अशा शब्दात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.