Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 18, 2022, 4:50 PM

Maharashtra Politics news | भाजपचे राज्य आणि केंद्र स्तरावरील अनेक मातब्बर नेते बारामती लोकसभा मतदारसंघात दौरा करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, भाजपने दंड थोपटल्यानंतरही खासदार सुप्रिया सुळे या मात्र निश्चिंत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पवार घराणे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा अविभाज्य भाग आहेत. याचे कारण म्हणजे शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या तिघांचाही सामान्य जनतेशी चांगला संपर्क आहे.

 

Supriya Sule
सुप्रिया सुळे, खासदार

हायलाइट्स:

  • सुप्रिया सुळे यांनी मुलींना सीटबेल्ट लावून दिला
  • इंदापूर भागात सुप्रिया सुळे यांनी नुकताच दौरा केला
इंदापूर: गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, २०२४ मध्ये या लोकसभा मतदारसंघातील पवार कुटुंबीयांची सद्दी संपवण्याचा विडा भाजपने उचलला आहे. त्यासाठी भाजपचे राज्य आणि केंद्र स्तरावरील अनेक मातब्बर नेते बारामती लोकसभा मतदारसंघात दौरा करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, भाजपने दंड थोपटल्यानंतरही खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या मात्र निश्चिंत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पवार घराणे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा अविभाज्य भाग आहेत. याचे कारण म्हणजे शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या तिघांचाही सामान्य जनतेशी चांगला संपर्क आहे. अजित पवार हे दर आठवड्याला बारामतीमध्ये जनता दरबार भरवून सामान्यांच्या व्यथा ऐकून घेतात. तर सुप्रिया सुळे यादेखील शरद पवार आणि अजित पवार यांच्याप्रमाणे सामान्य माणसांशी कशाप्रकारे जोडल्या गेल्या आहेत आणि त्या सामान्य जनतेशी किती सहजपणे संवाद साधू शकतात, याचे प्रत्यंतर इंदापूरमध्ये आले. दौंड, बारामती, इंदापूर, भोर, पुरंदर, खडकवासला हे सर्व भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतात. यापैकी इंदापूर भागात सुप्रिया सुळे यांनी नुकताच दौरा केला. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी शाळकरी मुलींना लिफ्ट दिली. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Sharad Pawar: एकवेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, पण बारामतीत शरद पवारांचा पराभव होणार नाही: जयंत पाटील
इंदापूर परिसरात काही लहान शाळकरी मुली नेहमीप्रमाणे एसटी बसची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यांना बघताच सुप्रिया सुळे यांनी गाडी थांबवली. गाडीतून उतरून सुप्रिया सुळे यांनी या विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी या मुलींना लिफ्ट दिली. त्यामुळे मुलींना एसटी बसऐवजी खासदार सुळे आणि आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या गाडीतून प्रवास करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे सुळे यांनी स्वतः मुलींना व्यवस्थित सीटबेल्ट लावला. इंदापूर तालुक्यातील गोखळी ते अंथुर्णे दरम्यानच्या प्रवासाने विद्यार्थिनी भारावून गेल्या होत्या.

Mission Baramati : भाजपचं मिशन बारामती जोरात, बावनकुळे पवारांच्या बालेकिल्ल्यात
बारामतीमध्ये भाजपची जोरदार फिल्डिंग

आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकून पवार कुटुंबीयांना धक्का देण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपचे प्रदेधाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच बारामतीचा दौरा केला होता. तसेच लवकरच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यादेखील बारामतीमध्ये जाणार आहेत. या माध्यमातून भाजपने बारामतीमध्ये आतापासूनच निवडणुकीची वातावरणनिर्मिती करायला सुरुवात केली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here