मुंबई: रिलायन्सचे इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी सध्या देवपूजा, धार्मिक ठिकाणी भेट देताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ते श्रीनाथजींच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. उदयपूर जवळील नाथद्वारा या गावात श्रीनाथजी मंदिर आहे. अंबानी कुटुंबाची श्रीनाथजींवर नितांत श्रद्धा आहे. यानंतर मुकेश अंबानी यांनी तिरुमला मंदिराला भेट दिली. प्रसिद्ध टेकडी मंदिरात प्रार्थना केल्यानंतर त्यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) येथे मागणी ड्राफ्ट सादर केला. अंबानींनी दर्शन घेतले आणि मंदिराच्या पुजाऱ्यांनी केलेल्या विधीमध्ये देखील सहभागी झाले. धार्मिक ठिकाणी भेटी देणारे मुकेश अंबानी यांनी येथे किती देणगी दिली आहे ते पाहूया.

अंबानी परिवाराची श्रीनाथजी यांच्यावर मोठी श्रद्धा

अंबानी कुटुंबात धीरूभाई अंबानी आणि कोकिलाबेन अंबानी यांची श्रीनाथजींवर श्रद्धा होती. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचीही श्रीनाथजींवर खूप श्रद्धा आहे. ईशा अंबानीच्या लग्नात श्रीनाथजींची महाआरती झाली होती.

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्वतंत्र संस्था उभारणार

तिरुमाला मंदिरातील अनुष्ठानामध्ये सहभाग

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी तिरुमला मंदिरासाठी १.५ कोटी रुपयांची देणगी दिली. प्रसिद्ध टेकडी मंदिरात प्रार्थना केल्यानंतर त्यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) येथे मागणी ड्राफ्ट सादर केला. अंबानींनी दर्शन घेतले आणि मंदिराच्या पुजाऱ्यांनी केलेल्या विधीमध्ये सहभागी देखील झाले.

देवावर श्रद्धा

अंबानी कुटुंब हे अतिशय धार्मिक मानले जाते. याआधी अंबानी कुटुंबाने सोमवारी राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरातही दर्शन घेतले होते. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातही त्यांना कुटुंबासोबत अनेकदा पाहिले गेले आहे. अंबानी कुटुंबाची देवावर खूप श्रद्धा आहे.

गुरुवायूर, केरळ येथील श्री कृष्ण मंदिरात पूजा

मुकेश अंबानी यांनी शनिवारी केरळमधील गुरुवायूर येथील श्रीकृष्ण मंदिरात प्रार्थना केली. त्यांनी मंदिरासाठी १.५१ कोटी रुपये दान केले. अंबानींसोबत त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि त्याची होणारी पत्नी राधिका मर्चंटही होती. मंदिर प्रशासनाने सांगितले की, कोणत्याही भाविकाने मंदिराला दिलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे.

टॉप १० श्रीमंतांच्या यादीत समावेश

मुकेश अंबानी यांचे नाव जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीत येते. मुकेश अंबानी यांची संपत्ती सध्या ९२.२ अब्ज डॉलर आहे आणि ते जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली आहे. अंबानी आता लवकरच 5G लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.
बीसीसीआयचा नवा निर्णय बनवणार क्रिकेट अधिक मनोरंजक, आयपीएलमध्ये लवकरच लागू करणार ‘हा’ नियम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here