Authored by अक्षय गवळी | Edited by सुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 18, 2022, 8:08 PM

Will Ambedkar and Thackeray come together : आज अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणून आता ज्यांना ज्यांना वाटतं की भारताचे संविधान सुरक्षित व्हावं, देशाची जातीय अवस्था निर्मूलन होवून न्याय व्यवस्था उभी राहावी. मग ती सामाजिक न्यायाची असो, आर्थिक न्यायाची असो, शैक्षणिक न्यायाची असो, यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असे आवाहन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केले आहे.

 

prakash ambedkar and uddhav thackeray (File Photo)
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?; शिवसेना खासदार अरविंद सावत म्हणाले…
अकोला : राज्यात शिंदे गटाने (Shinde Fiction) भाजपशी हातमिळवणी करत उद्धव ठाकरेंचे सरकार खाली खेचले आणि आपली सत्ता स्थापन केली. त्यानंतर राज्यातील राजकारण पुरते ढवळून निघाले आहे. यानंतर शिवसेनेसह आघाडी सरकारमधील पक्ष आक्रमक झाले असून प्रत्येकाने आपला जनाधार वाढवण्याचे कार्यक्रम घेण्यावर भर दिलेला दिसत आहे. अशात आपल्या पक्षात अनेक नेत्यांना आणि संघटनांना घेण्याची देखील चढाओढ पाहायला मिळत आहे. अशात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे नाव चर्चेत आले आहे. प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत येणार का,या मुद्द्यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी भाष्य केले आहे. (Will Ambedkar and Thackeray come together)

अरविंद सावंत म्हणाले की, भविष्यात बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे जर एकत्र येत असतील तर आनंदाची गोष्ट आहे. आज भारताचे संविधान हे डॉक्टर बाबासाहेबांची मोठी देणगी आहे. या सविधानावर हल्ला होत आहे. खरंच लोकशाही शिल्लक आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

अकोल्यात पावसाची तुफान बॅटिंग; रस्त्यांच्या झाल्या नद्या, अनेकांच्या घरात शिरले पाणी
आज अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणून आता ज्यांना ज्यांना वाटतं की भारताचे संविधान सुरक्षित व्हावं, देशाची जातीय अवस्था निर्मूलन होवून न्याय व्यवस्था उभी राहावी. मग ती सामाजिक न्यायाची असो, आर्थिक न्यायाची असो, शैक्षणिक न्यायाची असो, यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असे आवाहन सावंत यांनी केले आहे.

अकोला: PSIने मागवलं हरणाचं मांस, वन विभागाचे कर्मचारी चक्रावले; आरोपींची चौकशी सुरू
शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल- खासदार सावंत

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. दरम्यान, एमएमआरडीएने शिवाजी पार्कची शिंदे गटाला परवानगी दिल्यानंतर सावंत बोलतांना म्हणाले की शिवतीर्थासाठी शिवसेनेचा पहिला अर्ज आहे. तरीही असं होतं असेल तर हे गलिच्छ राजकारण आहे, थांबवले पाहिजे. दरम्यान शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल अशी ठाम भूमिका सावंत यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या सर्वामागे भाजप असल्याचे सावंत म्हणाले.
पावसाने होत्याचं नव्हतं केलं; शेतकऱ्याने आत्महत्या करत जीवन संपवलं; रस्त्यावरच करावे लागले अंत्यसंस्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here