Maharashtra Politics | मनसे आणि भाजपाची वाढती जवळीक पाहता आगामी पालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये युतीचे वारे पाहिले. दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत भेटीगाठी आणि चर्चाही होत असल्याचंही समोर आलं. पण या सरळ्यालाच राज ठाकरेंनी पूर्णविराम दिला. आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसेने पुन्हा एकदा ‘एकला चलो रे’ चा नारा दिलाय. मुंबईत मनसे सर्व जागांवर म्हणजेच २२७ जागांवर उमेदवार देणार असल्याचं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

हायलाइट्स:
- शिंदे गटाला ८५ ते ९० जागा सोडून त्यांनी मनसेच्या वॉर्डातील ताकदीनुसार त्यांना जागा द्यायच्या
- अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजप नेते अॅक्टिव्ह झाले आहेत
मनसेचं मुंबई-पुणे आणि नाशिक जिल्ह्यात अधिक वर्चस्व असलं तरी विदर्भात वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्यांना भाजपसारख्या तगड्या पक्षाला टक्कर द्यावी लागणार आहे. “नागपूर पालिका निवडणुका जाहीर झाल्या असे समजून मतदारांमध्ये जा. कामाला लागा, आपल्याला प्रत्येक जागेवर उमेदवार लढवायचा आहे. आगामी काळात विदर्भात पक्षांतर्गत बदल होतील. खांदेपालटही होईल. बदलांना तयार राहा. तुमच्यावर पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी आहे. पण एक निश्चित आहे की नागपूरमध्ये पक्ष वाढवायचा असेल, पक्षाला बळकटी द्यायची असेल तर प्रस्थापितांशी लढावं लागेल.” असं मोठं विधान नागपूरच्या दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजप नेते अॅक्टिव्ह झाले आहेत. यंदा मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसवायचा असा चंग भाजपचा असून आकड्यांची जुळवाजुळव महत्त्वाची ठरणार आहे. परंतु मनसेशी थेटपणे युती करुन त्यांना वेगळ्या जागा सोडणे भाजपला सद्याच्या राजकीय परिस्थितीत शक्य नसल्याचे जाणकार सांगतात. शिंदे गटाला ८५ ते ९० जागा सोडून त्यांनी मनसेच्या वॉर्डातील ताकदीनुसार त्यांना जागा द्यायच्या, असा काहीसा प्लान भाजपचा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
सध्या सत्तेमध्ये भाजपसोबत शिंदे गट देखील आहे. यामध्ये शिंदे गटातील सहभागी आमदारांचा पालिका निवडणुकीत किती फायदा होईल याबाबत सांशकता आहे. मनसेकडे अनेक जागांवर चांगले उमेदवार नसले तरी शिवसेनेच्या मराठी मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपा त्यांचा वापर करण्याचे संकेत आहेत. त्यामुळेच गणेशोत्सवादरम्यान, झालेल्या मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या भेटीला वेगळं महत्त्वा प्राप्त झालं होतं. त्यातच राज ठाकरेंनी मनसेनी जुळवून घेतलं आहे असं म्हटलं जात असतानाच आता मोठा ट्विस्ट आला.
मनसे आणि भाजपाची वाढती जवळीक पाहता आगामी पालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये युतीचे वारे पाहिले. दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत भेटीगाठी आणि चर्चाही होत असल्याचंही समोर आलं. पण या सरळ्यालाच राज ठाकरेंनी पूर्णविराम दिला. आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसेने पुन्हा एकदा ‘एकला चलो रे’ चा नारा दिलाय. मुंबईत मनसे सर्व जागांवर म्हणजेच २२७ जागांवर उमेदवार देणार असल्याचं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. मुंबईसोबतच इतरही सर्व महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.
त्यातच राज ठाकरेंचं आतापर्यंतचं राजकारण पाहिलं तर राज ठाकरेंची उत्तर भारतीयांविरोधात असलेली आक्रमकता असो… कोणत्याही विषयात पंतप्रधान मोदींची घेतलेली बाजू असो किंवा राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसवर असलेली नाराजी यामुळे पक्षाची असलेली धरसोड भूमिका ही विरोधकांच्या चांगलीच लक्षात येते. आता पक्षबांधणीसाठी राज ठाकरे विदर्भात प्रयत्न करतायंत खरे… पण नागपूरमधील राज ठाकरेंच्या वक्तव्यानतंर भाजप-मनसे युतीबाबत काय होणार हे सर्वांसमोरच प्रश्नचिन्ह आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.