भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकतीच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली होती. टी २० विश्वचषक १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून अंतिम सामना १३ नोव्हेंबरला होणार आहे. यावेळी स्पर्धेत १६ संघ सहभागी होत आहेत. यापैकी ८ संघ थेट गट-१२ साठी पात्र ठरले आहेत. तर उर्वरित ४ संघ पात्रता फेरी जिंकून आपले स्थान निश्चित करतील. या पात्रता फेरीत ८ संघ आमनेसामने असतील. अशा परिस्थितीत, आतापर्यंत गट-१२ आणि पात्रता फेरीतील सर्व १६ संघांपैकी १२ संघांनी आपले संघ घोषित केले आहेत. तर ग्रुप-१२ मध्ये फक्त न्यूझीलंडनेच आपला संघ जाहीर केलेला नाही. त्याच वेळी, यूएई, आयर्लंड आणि स्कॉटलंड यांनी पात्रता फेरीतील त्यांचे संघ अद्याप घोषित केलेले नाहीत.
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.