अकोला : शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाची राळ उडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असली तरी १५ आमदार मात्र ठामपणे ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. अकोला जिल्ह्यातील शिवसेना आमदार नितीश देशमुख अशाच निष्ठावान आमदारांपैकी एक आहेत. खरंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी बंड केलं तेव्हा आमदार देशमुख हेदेखील त्यांच्यासोबत सुरतला गेले होते. मात्र मला फसवून नेल्याचा आरोप करत नंतर देशमुख यांनी एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. याच नितीन देशमुख यांनी आता आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.

‘उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याचं षडयंत्र मागील दीड वर्षांपासून सुरू होतं. पैसे घेऊन सत्तांतर घडवण्यात आलं आहे. याबाबत माझ्याकडे पुरावे असून हे सिद्ध न झाल्यास आत्महत्या करेन,’ असं आमदार नितीन देशमुख यांनी म्हटलं आहे. तसंच बंडखोरी न केल्याने मला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीची धमकी देण्यात येत आहे. मात्र तुरुंगात डांबले तरी मी कदापी शिवसेना सोडणार नाही. खंडणीबहाद्दरांच्या तक्रारीवरून चुकीच्या पद्धतीने चौकशीची भीती दाखवण्यात येत असून, अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. एसीबीऐवजी माझ्यावर ईडीचे छापा टकाल्यास माझे नाव तरी आणखी मोठं होईल, असा टोलाही देशमुख यांनी लगावला आहे.

महापालिकेसाठी तिहेरी रणनीती; शिंदे- फडणवीस ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत

बंडखोर मंत्र्यांवर हल्लाबोल

‘मंत्री अब्दुल सत्तार, उदय सामंत यांना शिवसेनेत येऊन कमी कालावधी झाला आहे. त्यांनी राजीनामा द्यावा, मीही देतो. दोघेही निवडणूक लढवू,’ असं आव्हान नितीन देशमुख यांनी दिलं आहे. संपर्कमंत्री असताना गुलाबराव पाटील अकोल्यात किती वेळा आले असा सवाल करीत निष्ठेचा आव आणणऱ्यांनी गद्दारी केली, असंही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here