नाशिक : सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मनमाड शहर परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रविवारी दुपारपासून सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळपर्यंत सुरू होता. अतिवृष्टीमुळे शहरातून वाहणाऱ्या रामगुळणा आणि पांझन या दोन्ही नद्यांना महापूर येऊन त्यांनी रौद्रारूप धारण केलं आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

पुराचे पाणी नदीकाठच्या अनेक घरांसह दुकानांमध्ये शिरलं असून शिवाजी नगर, ईदगाह, कॉलेज रोड, टकार मोहल्ला या भागातील सर्व पूल पाण्याखाली गेले आहेत. परिणामी या सर्व भागाचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. तब्बल ३० वर्षांनंतर मनमाड शहरातील दोन्ही नद्यांना इतका मोठा पूर आला असल्याचं जाणकार सांगतात. एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा नद्यांना पूर येऊन त्याचे पाणी घरामध्ये शिरलं आहे.

पैसे घेऊनच राज्यात सत्तांतर, माझ्याकडे पुरावे आहेत, सिद्ध न झाल्यास…; नितीन देशमुखांचा नवा गौप्यस्फोट

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनातर्फे शेकडो लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. तसंच पूरग्रस्तांसाठी गुरुद्वारात राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून सलग होत असलेला मुसळधार पाऊस आणि नद्यांना महापूर आला असला तरी सुदैवाने अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here