औरंगाबाद : फेसबुकद्वारे मैत्री झालेल्या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये असणाऱ्या माजी सैनिकाने महिलेला दारू आणण्यासाठी बाहेर पाठवून घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील हिरापूर शिवारात घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. संजय उर्फ संजीव कौशल सिंग राठोर (वय-३८) असं आत्महत्या करणाऱ्या माजी सैनिकाचं नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, संजय राठोर हे एक वर्षापूर्वी सैन्यातून निवृत्त झाले होते. काही वर्षांपूर्वी त्यांची फेसबुकवरून परिसरातील एका महिलेसोबत ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघेही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. राठोर यांना दारू पिण्याची सवय होती. रविवारी दुपारी राठोर यांनी महिलेला दारू आणण्यासाठी बाहेर पाठवले आणि ते घरात एकटेच होते.

शिंदे सरकारकडून एसटी महामंडळाच्या निधीला कात्री, सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार?

काही वेळाने महिला जेव्हा घरी आली तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. अनेकवेळा आवाज देऊनही आतून प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी महिलेने याबाबत पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी घर गाठत दरवाजा तोडला असता राठोर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

… आता आतुरता उद्धवसाहेबांच्या गर्जनेची; दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचे पोस्टर

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठत चौकशी केली. राठोर यांनी आत्महत्या का केली हे स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी चिकलठाणा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास गात यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here