मोहाली : मोहालीतील एका खासगी विद्यापीठातील व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर कॅम्पसमधील वर्ग हे सहा दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहेत. या घटनेनंतर अनेक विद्यार्थी विद्यापीठ परिसर सोडून जात आहेत. प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास विद्यार्थ्यांनी आंदोलन संपवले. या घटनेनंतर वसतिगृहातील सर्व वॉर्डनच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती आहे. इतकंच नाहीतर वसतिगृहाच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

खरंतर, आरोपी एमबीएची विद्यार्थीनी होती. तीने इतर मुलींचे व्हिडिओ शूट केल्याचा आरोप विद्यापीठ प्रशासनाकडून सातत्याने केला जात आहे. याप्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरची प्रतही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत आरोपी तरुणी आणि तिचा प्रियकर आणि तिच्या मित्रासह ३ जणांना अटक केली आहे.

खोलीत तरुण-तरुणी, मोबाईलमध्ये सापडले धक्कादायक फोटो; मसाज पार्लरमध्ये जाताच पोलिसही हादरले
हे प्रकरण १७ सप्टेंबरला समोर आलं जेव्हा हॉस्टेलच्या मुलींना त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर दिसले. त्यांच्या विद्यापीठातील एका मुलीने हे व्हिडिओ शूट करून ते तिच्या प्रियकराला पाठवल्याचा आरोप मुलींनी केला आहे. पीडित मुलींनी जेव्हा आंदोलन करण्यास सुरुवात केली, तेव्हा याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

आरोपीच्या प्रियकराला अटक

दुसऱ्या दिवशी १८ सप्टेंबरला हा गोंधळ आणखी वाढला. विद्यापीठात दिवसभर हजारो विद्यार्थिनींनी निदर्शने केली. इकडे पोलिसांनी प्रियकराच्या शोधात शिमल्यात मोहीम राबवली आणि संध्याकाळी त्याला अटक करण्यात आली. आता या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे खुलासे होऊ शकतात, या आशेने प्रियकराची चौकशी करण्यात येत आहे. प्रियकराच्या अटकेनंतर, १८ सप्टेंबरच्या रात्री पोलिसांनी शिमल्यात एका ३१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं, या व्यक्तीचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

धक्कादायक! कॉलेजच्या तब्बल ६० मुलींचे MMS व्हायरल, ८ जणींचा एकाचवेळी आत्महत्येचा प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here