Pune Crime News Marathi : पुण्यात गुन्ह्यांच्या घटना वाढत असताना आताही एक असाच प्रकार समोर आला आहे. इथे एका भाईला बर्थडे साजरा करणं चांगलंच महागात पडलं आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी चक्क ५ महिन्यानंतर या प्रकरणी कारवाई केली आहे.

सध्याच्या काळात गुन्हेगार आणि तरुणांमध्ये रात्रीच्या वेळी चौका-चौकामध्ये गर्दी करून वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यात दहशत निर्माण करण्यासाठी वाढदिवसाचे केक तलवार, कोयत्यासारख्या मोठमोठ्या बेकायदेशीर हत्याराने कापले जातात. त्याचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. यावर आळा बसविण्याकरिता सदर प्रकारावर लक्ष ठेवून गुन्हे शाखा युनिट १ कडून कारवाई करण्यात येणार आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.